आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या महाभियोगातून मुक्त झाले असले तरी त्यांच्या अडचणी कमी होत नाहीयेत. सांगण्यात येत आहे की, ट्रम्प यांना नवीन कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. त्यांच्याविरोधात न्यूयॉर्कमध्ये चौकशी करणाऱ्या पथकासोबत जॉर्जियाच्या फिर्यादींनी हातमिळवणी केली आहे. ६ जानेवारीला कॅपिटल हिलवर झालेल्या हिंसाचाराबाबत गेल्या आठवड्यात सिनेटमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाची कारवाई झाली, तेव्हा जॉर्जियाच्या अधिकाऱ्यांनी घोषणा केली होती की, त्यांनी ट्रम्पद्वारा राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे निकाल बदलण्याचे प्रयत्न केल्याची चौकशी सुरू केली आहे. ट्रम्प यांनी निकाल आपल्या बाजूने करण्यासाठी अधिकाऱ्यांवर कसा दबाव टाकला होता, याचीही चौकशी केली जाणार आहे.
संबंधित सूत्रांचे म्हणने आहे की, दोन कॉलची चौकशी होत असल्याबद्दल जॉर्जियात चौकशीत सहभागी असणाऱ्या सचिवाने पुष्टी केली आहे. यातील एक कॉल ट्रम्प यांनी राज्याचे सचिव ब्रेड रेफेन्सपर्गर यांना केला होता. आपल्या बाजूने मतदान करुन घेण्यासाठी ट्रम्प यांच्या बातचीतची ऑडियो रेकॉर्डिंगही आहे. दुसरीकडे ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार जेसन मिलर यांनी म्हटले आहे की, फोन कॉलमध्ये काहीच नाही. दोघांमधील तो नियमित कॉल होता. दुसरीकडे ट्रम्प यांच्या विरोधात न्यूयॉर्कमध्ये गुन्हेगारी तपास सुरू आहे. तेथे मॅनहट्टन डिस्ट्रिक्ट अटॉर्नी कार्यालय ट्रम्प यांच्या संघटनेने विमा, कर आणि इतर योजनांद्वारे फसवणूक करुन कसे कायद्याचे उल्लंघन केले याचा शोध घेत आहे. या चौकशीची व्याप्ती खूप मोठी आहे.
९/११ हल्ल्यासारखी कॅपिटल हिल हल्ल्याची चौकशी
कॅपिटल हिलमधील हल्ल्याबाबत अमेरिकेच्या दोन्ही पक्षांना जशी ११ सप्टेंबरला झालेल्या हल्ल्याची चौकशी झाली होती तशी स्वतंत्र चौकशी हवी आहे. दंगल प्रकरणी चौकशीची योजना आहे. सिनेट रुल्स कमेटीत सुनावणी होणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.