आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओमायक्रॉन:न्यूयॉर्कमध्ये रुग्णसंख्येत 52 टक्क्यांनी झाली वाढ, अमेरिकेत 8.50 लाख नवे रुग्ण

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टनच्या एका शाळेत मुलांना कोरोना प्रोटोकॉलची माहिती देताना शिक्षक. - Divya Marathi
वॉशिंग्टनच्या एका शाळेत मुलांना कोरोना प्रोटोकॉलची माहिती देताना शिक्षक.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे अमेरिकेत सुमारे ८ लाख नवे बाधित आढळून आले आहेत. न्यूयॉर्कमध्ये ५ हजार ९०० बाधित रुग्णालयांत दाखल आहेत. ही संख्या गेल्या वर्षीच्या थंडीच्या ऋतूच्या तुलनेत ५२ टक्के जास्त आहे. न्यूयॉर्कमध्ये सुमारे ५० मोठी रुग्णालये आहेत. त्यापैकी ११ सरकारी रुग्णालये आहेत. रुग्णालयात सेफ्टीनेट योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जातात. परंतु सर्वच ठिकाणी खाटांचा तुटवडा आहे. न्यूयॉर्कची संख्या सुमारे २ कोटींवर असून सक्रिय रुग्णांची संख्या १६ लाख असल्याचे सांगण्यात येते. खाटांची संख्या मात्र केवळ ३७ हजार आहे. नॉर्थवेल रुग्णालयाच्या डॉ. अँजेला यांच्या म्हणण्यानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांचाही तुटवडा आहे.

ब्रिटन : नवीन रुग्ण १८ टक्के कमी, चौथा डोस नाही : सरकार
ब्रिटनमध्ये गेल्या चार दिवसांत नवीन रुग्णांचे प्रमाण १८ टक्क्यांनी कमी झाल्याचे सांगण्यात आले. ४ जानेवारीला २१८३७६ एवढे रुग्ण आढळले होते. ७ जानेवारीला या संख्येत घट होऊन ते १७८२५० वर आले आहे. यूके हेल्थ सिक्युरिटीनुसार बूस्टर डोस घेतल्याच्या तीन महिन्यांनंतरही कोरोना संसर्गापासून ९० टक्के संरक्षण मिळू शकते. म्हणूनच तूर्त तरी चौथ्या डोसची गरज नाही.

चार वर्षांहून कमी वयाची एक लाख मुले दाखल
सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत जानेवारी २०२२ मध्ये ४ वर्षांहून कमी वयाच्या एक लाखावर मुलांना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. ही संख्या डिसेंबर २०२१ च्या तुलनेत दुप्पट आहे. अमेरिकेत पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांना डोस दिला जात नाही. त्यातच अमेरिकेतील शाळांतील अध्यापन पुन्हा ऑनलाइन सुरू करण्याचीही मागणी जोर धरू लागली आहे. प्रमुख राज्यांपैकी असलेल्या शिकागोमध्ये ऑनलाइनचा प्रस्ताव पारित झाला आहे. इतर राज्यांतही शिक्षक तसेच पालक संघटना संसर्ग टाळण्यासाठी आंदोलन करत आहेत.

- जर्मनीत बार-रेस्तराँमध्ये ५० टक्के लोकांना परवानगी. बूस्टर डोसला सुरुवात. - फ्रान्समध्ये चोवीस तासांत विक्रमी चार लाख नवे रुग्ण, ८० टक्के आेमायक्रॉॅनचे. - ऑस्ट्रेलियात एकाच दिवसात एक लाख रुग्ण. व्हिक्टोरियात सर्वात जास्त. - रशियात एका दिवसात १६७३५ नवे रुग्ण, मॉस्कोमध्ये ३६९४ रुग्ण

बातम्या आणखी आहेत...