आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2021 ला वेलकम:सिडनीमध्ये नवीन वर्षाचा जल्लोष सुरू, न्यूझीलँडमध्ये कोणत्याही निर्बंधांशिवाय आतषबाजीने झाली नववर्षाची सुरुवात

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूझीलँड आणि ऑस्ट्रेलियामध्ये नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत झाले आहे. सर्वात आधी ऑकलँडच्या स्काय टॉवरवर रंगी-बेरंगी आतषबाजीने 2021 चे स्वागत करण्यात आले. ऑकलँड जगातील एकमेव शहर आहे, जिथे नववर्षाची सुरुवात कोणत्याही निर्बंधांशिवाय झाली आहे. यानंतर ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या हार्बर ब्रिजवर शानदार अंदाजात नवीन वर्षाचे स्वागत झाले.

कोरोना काळात नवीन वर्ष अनेक आशा घेऊन आले आहे. अनेक देशात जल्लोषाची तयारी आहे, पण सोबतच नियमांचेही पालन केले जात आहे. सर्वात आधी ऑस्ट्रेलियाच्या जवळील टोंगा आयलँडवर नव वर्षाचे आगमन झाले. जगाच्या स्टँडर्ड टाइमच्या हिशोबाने या ठिकाणी सर्वात आधी रात्रीचे 12 वाजतात.

अमेरिकेजवळील हॉलँड आणि बेकर आयलँड्सवर सर्वात शेवटी (भारतीय वेळेनुसार 1 जानेवारी सायंकाळी 5:30 वाजता) नवीन वर्षाचा सुर्योदय होतो. परंतू, या ठिकाणी कोणीच राहत नाही. महामारीच्या काळात कुठे, कशाप्रकारेच नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जगातील 4 शहरे, जिथे नवीन वर्षाचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले.

हा फोटो सिडनीतील ओपेरा हाउस आणि हार्बर ब्रिजचा आहे. येथील नवीन वर्षाचा उत्सव संपूर्ण जगात लोकप्रिय आहे.
हा फोटो सिडनीतील ओपेरा हाउस आणि हार्बर ब्रिजचा आहे. येथील नवीन वर्षाचा उत्सव संपूर्ण जगात लोकप्रिय आहे.
नवीन वर्षात संपूर्ण ऑकलँड शहरात रोशनाई करण्यात आली.
नवीन वर्षात संपूर्ण ऑकलँड शहरात रोशनाई करण्यात आली.
बुर्ज खलीफा जगातील सर्वात उंच इमारत आहे. येथे नव वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात येते. -फाइल फोटो
बुर्ज खलीफा जगातील सर्वात उंच इमारत आहे. येथे नव वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात येते. -फाइल फोटो
1907 मध्ये न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर पहिल्यांदा ईव बॉल पाडण्यात आली. -फाइल फोटो
1907 मध्ये न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर पहिल्यांदा ईव बॉल पाडण्यात आली. -फाइल फोटो
बातम्या आणखी आहेत...