आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत देशात कोरोना संक्रमनाची वाढती पार्श्वभूमी लक्षात इतर देशांनी भारतीय नागरिकांच्या प्रवासावर बंदी घालायला सुरुवात केली आहे. दरम्यान, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांनी यासंबंधी अधिकृत घोषणा केली असून 11 ते 28 एप्रिलपर्यत भारतीय नागरिकांच्या आगमनावर बंदी असणार आहे. कारण गेल्या चोवीस तासांत न्यूझीलंडमध्ये 23 प्रकरणे समोर आली असून त्यात 17 भारतीयांचा समावेश आहे.
सिंगापूरनेदेखील भारतीय नागरिकांच्या 8000 व्हिसावर बंदी घातली आहे. हे ते भारतीय नागरिक आहे जे गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे देशात आले होते. परंतु, आता त्या सर्व नागरिकांना परत जायचे होते. पण सिंगापूर सरकारने भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहता 8000 व्हिसावर बंदी घातली आहे.
न्यूझीलंडमध्ये 23 नवीन रुग्णांतील 17 भारतीय
गेल्या काही दिवसांत न्यूझीलंडमध्ये 2,531 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांनी सांगितले की, ही बंदी तात्पुरती असून यामुळे कोरोना संक्रमन रोखण्यासाठी फायदा मिळणार आहे. परंतु, गरज पडल्यास इतरही देशांवर असेच निर्बंध लावले जातील. आणि हे सर्व नियम न्यूझीलंडमधील नागरिकांनादेखील लागू होतील.
देशात विक्रमी 1 लाख 26 हजार 265 लोक संक्रमित
देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना दिसत आहे. बुधवारी देशात विक्रमी 1 लाख 26 हजार 265 लोक संक्रमित आढळले. गेल्या वर्षी महामारी सुरू झाल्याच्या नंतरपासून आतापर्यंत पहिल्यांदाच एका दिवसात एवढे लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यापूर्वी 6 एप्रिलला एका दिवसात 1.15 लाख लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
या व्यतिरिक्त बुधवारी 684 रुग्णांचा मृत्यू झाला आणि 59 हजार 129 लोक रिकव्हर झाले. यासोबतच कोरोना संक्रमितांचा आकडा आता 1.29 लाखांपेक्षा जास्त झाला आहे. यामध्ये 1.18 लाख लोक बरे झाले आहेत. तर 1.66 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 9 लाख 5 हजार रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.