आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी सोमवारी आपला देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली आहे. जेसिंडा यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांना ही माहिती मिळताच त्या आपल्या मुलीसोबत आनंदाने थिरकत होत्या. मला माझ्या देश आणि देशातील नागरीकांवर गर्व आहे. अतिशय कठीण असलेल्या कोरोनाविरुद्धच्या युद्धात आम्ही विजय मिळवला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यूझीलंडमध्ये कोरोनाची शेवटची रुग्ण एक 50 वर्षीय महिला होती. तिच्यावर ऑकलंड येथील नर्सिंग होममध्ये उपचार झाले.
न्यूझीलंडने कोरोनावर मात करण्यासाठी चार सूत्री कार्यक्रम राबविले. परंतु, या देशाच्या यशाचे सर्वात मोठे कारण होते ते म्हणजे, सरकारने केलेले प्रयत्न आणि त्यासाठी लोकांनी दिलेले समर्थन. या देशात सुद्धा 7 आठवडे कठोर लॉकडाउन पाळण्यात आले. 75 दिवस विविध प्रकारचे निर्बंध होते. यानंतर हळू-हळू सूट देण्यात आली. प्रवासाची सूट देण्यात आली. त्यावर सरकारने आवाहन केले होते, की लोकांनी केवळ देशातील पर्यटन स्थळांनाच भेट द्यावी. यामुळे लोकांचे मनोरंजनही होईल आणि सरकारची कमाई सुद्धा वाढेल.
अशी केली कोरोनावर मात
न्यूझीलंडची लोकसंख्या 50 लाखांपेक्षा कमी आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात या ठिकाणी कोरोनाच्या संसर्गास सुरुवात झाली. त्याच क्षणी न्यूझीलंड सरकारने कोरोनावर मात करण्यासाठी तयारी सुरू केली. मेडिकल एक्सपर्ट्सना सोबत घेऊन 4 सूत्री कार्यक्रम तयार करण्यात आला. यात 43 मुद्द्यांवर काम करण्यात आले. प्रत्येक टप्प्यात असलेल्या बिंदूंवर अतिशय काटेकोरपणे काम करण्यात आले. लोकांनी देखील त्याला तेवढाच प्रतिसाद दिला. 7 आठवड्यांपर्यंत लॉकडाउन होता. यानंतर दर आठवड्याला हळू-हळू त्यावर विचार करून सूट देण्यात आली. देशात कोरोनाचे एकूण 1154 रुग्ण सापडले होते. यात 22 जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी सरकारने 3 लाख लोकांच्या चाचण्या घेतल्या होत्या.
आता पुढे काय?
कोरोनावर मात केल्यानंतर सरकार हातावर हात ठेवून बसणार नाही. यापुढेही सरकार सतर्क राहणार आहे. 15 जून पर्यंत प्रत्येक संशयितावर नजर ठेवली जाणार आहे. त्या सर्वांच्या सातत्याने चाचण्या घेतल्या जातील. टेस्ट होईपर्यंत त्यांना वेगळेच ठेवले जाणार आहे. आरोग्य विभागाचे महासंचालक डॉक्टर अॅश्ले ब्लूमफील्ड यांनी ही माहिती दिली आहे.
खासगी आणि सार्वजनिक इव्हेंट होई शकतील. कुठलेही निर्बंध नाही.
28 फेब्रुवारीपासून बंद असलेल्या सार्वजनिक वाहतूक सेवा पुन्हा सुरू.
काळजी घेऊन रग्बी आणि इतर खेळ सुरू केले जातील. प्रेक्षकांना देखील परवानगी.
अलर्टचे 4 टप्पे, याचा अर्थ काय
न्यूझीलंड सरकरने अलर्टचे 4 टप्पे तयार केले होते. त्यात एकूण 43 पॉइंट होते. लेव्हल 1 म्हणजे, सर्वात कमी आणि लेव्हल 4 म्हणजे, सर्वात जास्त धोका असे निश्चित करण्यात आले होते.
अलर्ट लेव्हल 4 : लॉकडाउन
अलर्ट लेवल 3 : प्रतिबंध
अलर्ट लेव्हल 2 : धोक्याची क्षमता घटली
अलर्ट लेव्हल 1: धोका टळला नाही
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.