आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूझीलंड:एका शहरात लॉकडाऊन, तर दुसऱ्यात उत्सव; 32 हजार लोक जमले

वेलिंग्टन18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑस्ट्रेलियाची ट्रॅव्हल बबलवर बंदी

न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये सोमवारपासून लाॅकडाऊन लागू करण्यात आला, तर दुसरे शहर वेलिंग्टन उत्सवात बुडालेले दिसले. राजधानी वेलिंग्टनमध्ये ३४ हजार ५०० क्षमतेच्या स्काय स्टेडियममध्ये संगीत कार्यक्रम झाला. यात प्रख्यात बँड सिक्स- ६० ने सादरीकरण केले. त्याला नाव देण्यात आले, पृथ्वीवरील सर्वात मोठा कार्यक्रम. यात सुमारे ३२ हजार जण सहभागी झाले. वेलिंग्टनची लोकसंख्या २.१६ लाख आहे आणि न्यूझीलंडचे तिसरे मोठे शहर. म्हणजे कार्यक्रमात शहरातील १५ टक्के लोक सहभागी झाले आणि १६.७ लाख लोकसंख्येच्या सर्वात मोठ्या शहरात तीन दिवसांचा लॉकडाऊन लागला आहे.

ऑस्ट्रेलियाची ट्रॅव्हल बबलवर बंदी
सिडनी| ऑकलंडमध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ७२ तासांसाठी ट्रॅव्हल बबलवर बंदी घातली आहे. न्यूझीलंडमधून येणारी सर्व विमाने रेड झोनमध्ये ठेवण्यात आली, तर ऑस्ट्रेलियात येणाऱ्यांना १४ दिवसांसाठी क्वाॅरंटाइन केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...