आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना लसीमुळे मृत्यू:न्यूझीलंडमध्ये फायझर लस घेतल्यानंतर महिलेचा मृत्यू; सरकार म्हणते - दुर्मिळ दुष्परिणाम, लसीकरण सुरू राहील

वेलिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 वर्षांवरील मुलांना फायझर लस दिली जात आहे

न्यूझीलंडमध्ये फायझर लस घेतल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कोरोना लसीमुळे मृत्यूची देशातील ही पहिलीच घटना आहे. या महिलेचा मृत्यू मायोकार्डिटिसमुळे झाला असल्याचे इंडिपेंडेंट व्हॅक्सीन सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डाने म्हटले आहे. महिलेला इतर काही वैद्यकीय समस्या होत्या त्यामुळेदेखील या महिलेचा मृत्यू झाला असावा असे बोर्डाने सांगितले आहे.

मायोकार्डिटिसमध्ये हृदयाचे स्नायू सूजतात. यामुळे हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी होते. हृदयाच्या ठोक्याच्या लयामध्येही बदल होतो. ज्यामुळे रुग्णाच्या मृत्यूचा धोका वाढतो.

कंपनीचे स्पष्टीकरण नाही
आरोग्य मंत्रालयाने हा मृत्यू दुर्मिळ दुष्पपरिणामाने झाला असावा असे म्हटले आहे. यासोबतच देशातील लसीकरणाची मोहीमदेखील सुरुच राहणार आहे. परंतु, जेंव्हा कंपनीकडून याबाबत स्पष्टीकरण मागितले गेले, तेंव्हा कंपनीने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

12 वर्षांवरील मुलांना फायझर लस दिली जात आहे
अमेरिकन शास्त्रज्ञांनी फायझरची लस तयार केली आहे. ही लस 12 वर्षांवरील मुलांना देखील दिली जात आहे. अमेरिकेचा विचार केल्यास आतापर्यंत या लसीमुळे एकाचेही मृत्यू झाले नसल्याचे समोर येत आहे.

बातम्या आणखी आहेत...