आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका:आरोग्य कर्मचाऱ्यांनी खबरदारी घेतल्याने वादळी रात्री नवजात सुखरूप!

लुसियाना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील लुसियाना प्रांतातील लेक चार्ल्स येथील एक रुग्णालय सध्या चर्चेत आहे. त्यामागे लॉरा वादळात येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखवलेले धाडस आणि माणुसकी कारणीभूत ठरली आहे. लॉरामुळे प्रचंड हानी होती. मुसळधार पाऊस आणि ताशी २५० किमी वेगाने वारे वाहत होते. अशा वादळी रात्री लेक चार्ल्स वूमेन मेमोरियल हॉस्पिटलच्या एनआयसीयूचे कर्मचारी नवजात बालकांचे जणू सुरक्षा कवच बनले होते. रुग्णालयात १९ नवजात भरती होते. त्यापैकी काही व्हेंटिलेटर काही फीडिंग ट्यूबवरही होते. रुग्णालयातील वीजपुरवठा देखील खंडित झालेला होता. पाण्याचा पुरवठाही नव्हता. एसी बंद झाला होता. अशा प्रतिकूल परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी धैर्याचे दर्शन घडवले.

रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर जुआन बोसाने म्हणाले, वादळाची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी बालकांना खबरदारी म्हणून मुख्य ब्लॉकमध्ये हलवले होते. केवळ दोनच तासांत हे अभियान पूर्ण करण्यात आले. डॉ. बोसानो यांच्या मते, अत्यंत कमी वेळात बालकांना आणि वैद्यकीय उपकरणांना हलवणे कठीण काम होते. परंतु या कर्मचाऱ्यांनी ते करून दाखवले. आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांवर गर्व आहे. या दहा मजली इमारतीत जनरेटरची सुविधा आहे. परंतु जुन्या ब्लॉकमध्ये बालकांना सुरक्षित ठेवता येऊ शकेल, अशी जागा शिल्लक नव्हती. कारण तेथे नऊ फुटापर्यंत पाणी साचू शकते. १६ परिचारिका व २ श्वासोच्छवास संबंधी तज्ञ डॉक्टर रात्रभर निगराणी ठेवून होते.

80 हजार लोक अजूनही अंधारात, ट्रम्प दौऱ्यावर
परिस्थिती प्रतिकूल असतानाही डॉक्टर बोसाने फेसबुकवर रुग्णालयाबद्दलची माहिती देत होते. रुग्णालयात दाखल आपल्या लाडक्या बाळाबद्दल आई-वडिलांना काही चिंता वाटू नये, असा त्यामागील उद्देश होता. दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रविवारी लेक चार्ल्सचा दौरा केला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser