आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूचा अहवाल:वृत्तपत्रातील जाहिराती सर्वाधिक विश्वसनीय, 82% लोकांचा प्रिंट माध्यमांवरच विश्वास

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृत्तपत्रातील जाहिरातींना सर्वाधिक विश्वासार्हता असते. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या अहवालानुसार ग्राहक अजूनही सोशल मीडियापेक्षा वर्तमानपत्र, टीव्ही, रेडिओवर अधिक विश्वास ठेवतात. यात वर्तमानपत्रेही आघाडीवर आहेत. सर्वाधिक ८२ टक्के लोकांनी प्रिंट माध्यमावर विश्वास व्यक्त केला आहे. हा अभ्यासदेखील आश्चर्यकारक आहे. कारण गेले दशक डिजिटल मार्केटिंगच्या नावावर होते. इंटरनेटवरून शंभर टक्के विक्री करणाऱ्या कंपन्याही येत्या १२ महिन्यांत पारंपरिक जाहिरातींवरील (वृत्तपत्र, टीव्ही-रेडिओ) खर्च ११.७ टक्क्यांनी वाढवणार आहेत. पारंपरिक जाहिरातींवर पुन्हा विश्वास ठेवण्याची मुख्य कारणे येथे आहेत.

ब्रँडच्या विश्वासार्हतेत वर्तमानपत्रे आघाडीवर आहेत
मार्केटिंग शेरपा अनुसार- आजही जाहिरातींबाबत वृत्तपत्रांवर सर्वाधिक लोकांचा विश्वास आहे.

डिजिटल जाहिराती लोकांना आवडत नाही
हब स्पॉटच्या सर्व्हेनुसार ५७% लोकांना व्हिडिओआधी जाहिराती आवडत नाही. ४३% तर पाहतही नाही. ते वेबसाइटवर कुठला लेख वाचतात तेव्हा या डिजिटल जाहिरातींमुळे ब्रँडबद्दल नकारात्मता निर्माण होते.

थर्ड पार्टी कुकीजचा शेवट जवळ
थर्ड पार्टी कुकीज़...ज्याद्वारे वापरकर्त्याला त्याची आवड, शोधाच्या आधारावर जाहिराती दाखवल्या जातात. त्या कुकीजचा शेवट जवळ आला आहे. गुगल २०२३च्या अखेर क्रोममधून हे काढेल. अॅपल तेच करत आहे. हेच कारण आहे की १९.८% कंपन्यांनी पारंपरिक जाहिरातींमध्ये गुंतवणूक केली आहे, असे सीएमओ सर्वेक्षणात म्हटले आहे

एबीक्यूटीच्या संशोधनानुसार वर्तमानपत्रे, टीव्ही आणि रेडिओ डिजिटल चॅनलच्या तुलनेत चांगली कामगिरी करतात.जिथे ऑनलाइन जाहिरातींचे दर वाढले तिथे पारंपरिक माध्यमांत दर कमी झाले आहे.

विपणन शेर्पा यांचा अहवाल सांगतो अर्ध्याहून अधिक ग्राहक वृत्तपत्रातील जाहिरातींच्या आवडीच्या आधारावर पाहतात. त्याच वेळी ग्राहक डिजिटल जाहिरातीमुळे त्रासलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...