आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतवंशीय निक्की यांचे श्वेत राष्ट्रवादास समर्थन:मते मिळण्याच्या आशेने निक्की स्वत:ला म्हणताहेत कट्टर ख्रिश्चन

न्यूयाॅर्क14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी सादर करणाऱ्या भारतवंशीय निक्की हेली यांनी मोठा डाव टाकला आहे. द. कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली मतांच्या आशेपोटी स्वत:ला ‘कट्टर’ ख्रिश्चन म्हणवत आहेत. आपल्या ख्रिश्चन प्रतिमेच्या रिपॅकेजिंगसाठी त्यांनी एका पीआर एजन्सीला जबाबदारीही दिली आहे. आपल्या उमेदवारीच्या कॅम्पेनचे लाँचिंगही त्यांनी कट्टवादी पाद्री जॉन हॅगी यांच्या हातून केले. कट्टर वर्णद्वेषी गोऱ्या राष्ट्रवादींना समर्थन दिल्यामुळे अमेरिकेत राहणारे भारतवंशीय लोक निक्की यांच्यावर नाराज आहेत. न्यूजर्सीत काम करणारे टेक्नोक्रॅट चेतन शर्मा म्हणतात, भारतीयांवर वर्णाच्या आधारे होणाऱ्या हल्ल्यांमागे आणि भेदभावामागे श्वेत राष्ट्रवादी संघटनाच असतात. निक्की हेली आमच्या (भारतीय) समुदायाच्या असतानाही भारतवंशीयांचे मुद्दे लावून धरत नाहीत.

शर्मा यांनी निक्की यांच्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित करत सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात भारतवंशीयांवरील हल्ल्यांच्या घटनांवर त्या काहीच बोलल्या नाहीत. व्होट बँकेसाठी त्या गोऱ्या मतदारांना नाराज करू इच्छित नाहीत. निक्की आपल्या भारतीय वारशाबाबतही फार कमी बोलतात. निक्की हेलींवर आरोप : राजकीय लाभासाठी धर्मांतर केले दक्षिण कॅरोलिनाचे माजी सिनेटर जॅक नॉट्स म्हणतात, निक्की या खऱ्या ख्रिश्चन नाहीत, हे सर्वांना माहीत आहे. राजकीय लाभासाठी त्यांनी धर्मांतर केले आहे. निक्की यांनी गोऱ्या ख्रिश्चनासोबतही यासाठीच लग्न केले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या कट्टरवादी नेत्या एन. कोल्टर यांनी तर निक्की यांच्या अमेरिकन राष्ट्रीयत्वावरच प्रश्न उपस्थित केला आहे. त्या म्हणतात, निक्की यांनी तर भारतात निघून जायला हवे. राष्ट्रपतिपदाच्या दावेदारीमध्ये निक्की यांना २% मतेही मिळू शकणार नाहीत.

ट्रम्प समर्थक कट्टरवादी मतदारांवर नजर इंडियन अमेरिकन इम्पॅक्ट संघटनेचे संचालक नील मखिजा म्हणतात, निक्की हेली गोऱ्या वर्णद्वेषासारख्या मुद्द्यांचे समर्थन करत रिपब्लिकन पक्षाच्या कट्टरवादी ट्रम्प समर्थक मतदारांना आपल्याकडे आकर्षित करू इच्छितात. राजकीय तज्ज्ञ वजाहत अली सांगतात, निक्की आपल्या भारतीय ओळखीचा दुरुपयोग करत आहेत.

आधी शीख पालकांबद्दल बोलत, आता ख्रिस्ताबाबत न्यूजर्सीतील डिकिन्सन विद्यापीठातील प्रा. ख्याती जोशी यांच्या मते, २००५ मध्ये स्थानिक निवडणुकांत निक्की आपले माता-पिता शिख असल्याबद्दल बोलत असत. आता त्या आपल्या संकेतस्थळात स्पष्टपणे येशू ख्रिस्ताचा उल्लेख करतात. संकेतस्थळावर त्या एका सेक्शनमध्ये ख्रिश्चन प्रार्थनेचा उल्लेखही करतात.

बातम्या आणखी आहेत...