आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Nine Lakh Crores Of Foreign Black Money Comes To London Every Year, Financial Criminals Take Advantage Of The Flaws In The Law

काळा धंदा:लंडनमध्ये दरवर्षी येतो नऊ लाख कोटी रुपयांचा विदेशी काळा पैसा, कायद्यातील त्रुटींचा फायदा घेतात आर्थिक गुन्हेगार

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वर्षांपासून लंडनमध्ये रशिया आणि इतर देशांकडून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा येतो. श्रीमंत रशियन अनेक कारणांमुळे ब्रिटनच्या राजधानीकडे आकर्षित झाले आहेत. जगातील आघाडीचे आर्थिक केंद्र आणि सैल नियम - कायदे असलेले ब्रिटन हे काळ्या पैशासाठी आदर्श ठिकाण झाले आहे. लंडनमध्ये भरपूर आलिशान मालमत्ता आहेत, तो काळा पैसा रोखण्याचा एक आदर्श मार्ग आहे. नॅशनल क्राइम एजन्सीच्या (एनसीए) अंदाजानुसार दरवर्षी ९.६० लाख कोटी रुपये विदेशी मनी लाँडरिंगच्या माध्यमातून लंडनमध्ये येतात.

ब्रिटिश सरकारांनी रशियन पैशाचा प्रवाह रोखण्यासाठी खूप कमी उपाय केले. मात्र, युक्रेन युद्धानंतर परिस्थिती बदलली. ब्रिटनने १,६०० हून अधिक रशियन आणि व्यवसायांवर निर्बंध लादले आहेत. यामध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या १०० हून अधिक अब्जाधीशांचा समावेश आहे. मार्चमध्ये युक्रेनवरील हल्ल्याच्या तीन आठवड्यांनी संसदेत आर्थिक गुन्हे विधेयक सादर करण्यात आले.

ब्रिटनमध्ये अनेक दशकांपासून डर्टी मनी अव्याहत वाहत आहे. २००८ पासून जारी करण्यात आलेल्या गुंतवणूकदार व्हिसापैकी ३५ टक्के चिनी नागरिकांना मिळाले. ब्रिटनची कायदेशीर व्यवस्था बेकायदेशीर पैसा आणणाऱ्यांसाठी अनुकूल आहे. केंब्रिज युनिव्हर्सिटीचे जेसन शर्मन म्हणतात की, बेकायदेशीर पैशांना जेवढे संरक्षण आहे तेवढेच स्वच्छ पैशासाठी आहे. थिंक टँक चॅथम हाऊसने २०२१ मध्ये प्रकाशित अहवालात म्हटले की, ब्रिटनमध्ये मनी लाँडरिंग किंवा काळ्या पैशाची लाँडरिंग रोखण्याची जबाबदारी बँका, वकील व खासगी क्षेत्रातील इतरांवर सोडण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...