आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:ब्रिटनमध्ये 10 पैकी 9 महिला डॉक्टर भेदभावाच्या शिकार, संधीही कमीच, प्रशिक्षणात पुरुष सहकाऱ्यांची मसाज करण्यास सांगितले

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटिश मेडिकल असोसिएशनच्या सर्व्हेत खुलासा- 31% महिला डॉक्टरांशी छेडछाड

कार्यस्थळी महिलांशी भेदभाव, ही नवीन बाब नाही. परंतु वैद्यकीयसारख्या सन्मानजनक पेशात तो होणे ही चिंतेची बाब आहे. ब्रिटनमध्ये ही परिस्थिती भयावह आहे. तेथे प्रत्येक १० महिला डॉक्टरांपैकी ९ जणींना भेदभावाचा सामना करावा लागतो. यात छेडछाड, कामाची संधी न मिळणे आणि पुरुष सहकाऱ्यांच्या खांद्याची मसाज करणे अशा छळांचा समावेश असल्याचा खुलासा ब्रिटिश मेडिकल असोसिएशनच्या सर्वेक्षणात करण्यात आला आहे.

या सर्व्हेमध्ये सहभागी ९१% महिला डॉक्टर्सनी सांगितले की, त्यांना कामादरम्यान भेदभावाचा सामना करावा लागला. तर ७०% चे म्हणणे आहे की त्यांच्या व्यावसायिक क्षमतेवरही संशय घेतला जातो. यामुळे त्या निराश झाल्या आहेत. सर्वेक्षणात २४०० हून अधिक डॉक्टरांना सहभागी करण्यात आले होते. या सर्वेक्षणानुसार नॅशनल हेल्थ सर्व्हिस (एनएचएस)च्या निम्म्याहून अधिक महिला डॉक्टरांशी गैरवर्तन किंवा मारहाण झाली. ८४% डॉक्टर्सनी मान्य केले की, वैद्यकीय क्षेत्रात लैंगिक भेदभाव मोठा मुद्दा आहे. तर ७५ % डॉक्टर्सच्या मते भेदभाव करिअरच्या प्रगतीतील मोठी बाधा आहे. महिला म्हणून त्यांना कामाची संधीही कमीच दिली जाते. ३१% डॉक्टर्सनी सांगितले की त्यांना कामाच्या ठिकाणी छेडछाडीला सामाेरे जावे लागले. तर ५६% डॉक्टर्सना मौखिकरीत्या वाईट वागणूक आणि धमक्या मिळाल्या. एका कनिष्ठ डॉक्टरने सांगितले की, सर्जिकल टीममध्ये प्रशिक्षणादरम्यान त्यांना पुरुष सहकाऱ्यांच्या खांद्याची मालिश करण्यास सांगितले गेले. एका डॉक्टरला मुलाखतीदरम्यान विचारले गेले की ती कुटुंब वाढवण्याची योजना आखत आहे का? त्यांना सांगितले जाते की तुमच्याकडे येणारा रुग्ण उचित पुरुष डॉक्टरला दाखवू इच्छितो. एका डॉक्टरने सांगितले की, “मी दिसायला सुंदर नसल्याने बैठकीत लक्ष आकर्षित करू शकेन. एकंदर ते मला मूर्ख ठरवू पाहत होते.” कनिष्ठ डॉक्टर चेल्सी ज्विट म्हणाली की, पुरुष सहकाऱ्यांमुळे ती दुर्लक्षित राहिली आहे. ती म्हणाली, ‘माझ्याशी अशा सुरांत बोलले गेले की त्यामुळे मला अपमान वाटला. ’

महिला डॉक्टर्सचे वेतन पुरुष डॉक्टरांच्या तुलनेत 35 लाख रुपये कमी
महिला डॉक्टर्सशी केवळ बोलण्यात आणि वागण्यात भेदभाव होत नाही तर महिला डॉक्टर्सना वेतनातही भेदभाव केला जातो. ब्रिटनमध्ये महिला डॉक्टरांना वेतनही पुरुषांच्या तुलनेत ३०% कमी आहे. न्यू मेडस्केपच्या सन २०२० च्या सर्वेक्षणानुसार महिला डॉक्टरांना पुरुषांच्या तुलनेत ३५ लाख रुपये कमी मिळतात. असोसिएशच्या प्रतिनिधी मंडळाच्या कार्यवाहक प्रमुख डॉ. लतीफा पटेल म्हणाल्या की, आम्ही २०२१ मध्येही अशा असमानतेबाबत बोलत आहोत, हे भयावह आहे. असोसिएशनने म्हटले की हे आकडे घाबरवणारे आणि अहवाल चकित करणारे आहेत.

बातम्या आणखी आहेत...