आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ईडीची कारवाई:फरार नीरव मोदीची 300 कोटींपेक्षा जास्तीची संपत्ती ईडीकडून जप्त, यात लंडन आणि यूएईमधील फ्लॅट्सचा समावेश

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मार्च 2020 मध्ये ईडीने नीरव मोदीच्या संपत्तीचा लिलाव केला होता
Advertisement
Advertisement

सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) पीएनबी घोटाळ्यातील आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदीवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने सांगितले की, आर्थिक गुन्ह्यातील आरोपी नीरव मोदीची 300 कोटींपेक्षा जास्तीची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

न्यूज एजेंसी एएनआयने सांगितल्यानुसार, ईडीने नीरवची 329.66 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. या संपत्तीत मुंबईतील आइकॉनिक बिल्डिंग समुद्र महलचे चार फ्लॅट, एक सी-साइड फार्महाउस, अलीबागमधील जमीन, जेसलमेरमधील पवन चक्की, लंडनमधील फ्लॅट आणि संयुक्त अरब अमीरातमधील रेजिडेंशियल फ्लॅट, शेअर आणि बँकेतील रकमेचा समावेश आहे.

यापूर्वी झाला लिलाव

मार्च 2020 मध्ये ईडीने नीरव मोदींची बरीच संपत्ती जप्त करुन, लिलाव केला होता. यात महाग पेंटिंग्स, घड्याळ, पर्स, महागड्या कार्स, हँडबैगसारख्या वस्तुंचा समावेश होता. ईडीने सांगितल्यानुसार, त्या लिलावातून 51 कोटींची रिकव्हरी झाली होती.

लंडनच्या वांड्सवर्थ तुरुंगात आहे नीरव मोदी

13 हजार 700 कोटींचा पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव लंडनमधील वांड्सवर्थ जेलमध्ये बंद आहे. भारताच्या अपीलनंतर प्रत्यार्पण वॉरंट जारी झाल्यानंतर लंडन पोलिसांनी मागच्या वर्षी 19 मार्चला नीरवला अटक केली होती. त्याचा जामीन अर्ज आतापर्यंत पाचवेळा रद्द झाला आहे. भारत मागील अनेक दिवसांपासून त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नात आहे. मागच्या महिन्यात वेस्टमिंस्टर न्यायालयाने नीरव मोदीला 9 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

Advertisement
0