आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेतील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी भारतातील मुस्लिमांवरील हिंसाचाराच्या मुद्द्यावर विधान केले. अर्थमंत्री म्हणाल्या की, हे मत अशा लोकांनी बनवले आहे जे कधी भारतातही आले नाहीत. भारतात मुस्लिमांविरोधात हिंसाचार झाला असता तर त्यांची लोकसंख्या एवढी वाढली असती का? जगातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या भारतात आहे.
वॉशिंग्टन येथील पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स (PIIE) येथे भारतातील आर्थिक वाढीच्या मुद्द्यावर निर्मला सीतारामन बोलत होत्या.
मुस्लिम, हिंसाचार आणि अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर सीतारामन यांची 5 उत्तरे...
1. भारतात या आणि येथे काय चालले आहे ते पाहा
PIIE चे अध्यक्ष अॅडम एस. पोसेन यांनी प्रश्न विचारला की, भारताविषयीच्या काही धारणा गुंतवणुकीवर परिणाम करत आहेत का. यावर सीतारामन म्हणाल्या की, ‘याचं उत्तर त्या गुंतवणूकदारांकडून मिळू शकते जे भारतात आले आहेत आणि येत आहेत. जर कोणाला गुंतवणूक करायची असेल, तर मला एवढंच सांगायचे आहे की, भारतात काय होतेय ते बघा. अशा लोकांचे मत ऐकू नका जे कधीही भारताच्या भूमीवर आले नाहीत आणि तसेच रिपोर्ट देतात.’
2. भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या
पोसेन यांनी निर्मला सीतारामन यांना विचारले की पाश्चात्य मीडियामध्ये विरोधी खासदार त्यांचे सदस्यत्व गमावत आहेत आणि भारतातील मुस्लिम अल्पसंख्याकांवर हिंसाचार होत असल्याच्या बातम्या येत आहेत. यावर सीतारामन म्हणाल्या की, ‘भारतात मुस्लिमांची जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे. बहुतेक अहवाल हे भारतातील मुस्लिमांचे जीवन कठीण आहे की सरकारच्या मदतीने कठीण झाले आहे याविषयी आहेत.’
जर असे काही मत असेल किंवा त्यात काही वास्तव असेल तर मला विचारायचे आहे की, जर हे खरेच घडत असेल तर 1947 मध्ये जेवढे मुस्लिम होते, त्यांची लोकसंख्या त्यानंतर इतकी वाढली असती का?
3. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती बिकट
अर्थमंत्री म्हणाल्या की, ‘पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यांच्यावर किरकोळ आरोप लावले जातात आणि त्यांना फाशीची शिक्षाही दिली जाते. बहुतांश घटनांमध्ये ईशनिंदा ही वैयक्तिक वैर काढण्यासाठी लावले जात आहे. अशा प्रकरणात पीडितांना ताबडतोब दोषी ठरवले जाते. ना तपास व्यवस्थित होतो ना कोर्टात केस चालवली जाते.’
4. पाकिस्तानने अल्पसंख्याकांचे संरक्षण करणार असल्याचे सांगितले होते, ते मारले जात आहेत
अर्थमंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या की, ‘जेव्हा भारताची फाळणी झाली, तेव्हा पाकिस्तानचीही निर्मिती झाली. पाकिस्तानने स्वतःला इस्लामिक देश घोषित केले, पण अल्पसंख्याकांना संरक्षण दिले जाईल, असेही सांगितले. आज तेथे प्रत्येक अल्पसंख्याक समुदायाची संख्या कमी होत आहे. ते मारले जात आहे, तेथे काही मुस्लिम वर्गही आहेत, ज्यांना तिथे मारले जात आहे.
मुहाजिर, शिया आणि मुख्य प्रवाहात न स्वीकारलेल्या प्रत्येक वर्गाविरुद्ध हिंसाचार होत आहे. तर दुसरीकडे तुम्हाला भारतात दिसेल की मुस्लिम त्यांचे व्यवसाय करत आहेत, त्यांची मुले शिक्षण घेत आहेत. सरकार त्यांना फेलोशिप देत आहे.
5. असे अहवाल लिहिणाऱ्यांनी भारतात येऊन आपले म्हणणे सिद्ध करावे
अर्थमंत्री म्हणाल्या की, ‘जर संपूर्ण भारतभर मुस्लिमांविरुद्ध हिंसाचार झाला असता तर त्यांना त्याचा फटका बसला असता. हे चुकीचे विधान आहे हे स्पष्ट आहे. त्यांची लोकसंख्या कमी झाली आहे का? कोणत्याही एका समुदायातील मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे का? जे असे अहवाल लिहितात त्यांना मी भारतात येऊन त्यांचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी आमंत्रित करते.’
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.