आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासा पुढील वर्षी उपग्रह लाँच करणार:‘निसार’मुळे संकटाची माहिती आधीच मिळेल; सीमेवरील गस्तीत मदत

अमेरिका13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्रो व अमेरिकी अंतराळ संस्था नासाची संयुक्त निर्मिती पृथ्वी अवलोकन उपग्रह निसार (NISAR) भारतात आला आहे. तो पुढील वर्षी आंध्र प्रदेशातून लाँच होईल. याचे फायदे समजून घेऊया...

{निसार उपग्रह कसा आहे? हा उपग्रह आधुनिक एसयूव्हीच्या आकाराचा आहे. तो द.कॅलिफोर्नियात नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत(जेपीएल) विकसित केला आहे. इस्रोनुसार, हा आमच्या व्यापक शक्यतांचे एक उदाहरण आहे. २,८०० किलोच्या या उपग्रहात ३९ फुटाचा फिक्स्ड अँटिना रिफ्लेक्टर असून तो सोन्याच्या जाळीपासून तयार केला आहे. या अँटिनात छोट्यातील छोटा बदल टिपण्याची क्षमता आहे. {किती अंतरावरचे छायाचित्र घेईल? उपग्रह सलग पाच तास काम करण्याची आशा आहे. इस्रोने या योजनेवर ७८८ कोटी रु. तर नासाने ८०.८ कोटी डॉलर योगदान दिले आहे. याचे रडार एवढे सक्षम आहे की, २४० किमीपर्यंतच्या क्षेत्रफळाचे एकदम स्वच्छ चित्र घेऊ शकेल. पृथ्वीला एक प्रदक्षिणा १२ दिवसांत घालेल. {कोणकाेणती माहिती देईल? हा उपग्रह चक्रीवादळ, वादळ, ज्वालामुखी, भूकंप हिमनदी वितळणे, सागरी वादळ, वनवा, समुद्रातील पातळीत वाढ, शेती, जमिनीची आर्द्रता, बर्फ कमी होणे आदींची आधीच माहिती देऊ शकेल. पृथ्वीच्या चुहूबाजूस जमा होणारा कचरा व पृथ्वीकडे अंतराळातून येणाऱ्या धोक्याचीही माहिती हा उपग्रह देऊ शकेल. झाडांची घटत्या-वाढत्या संख्येवर लक्ष ठेवेल. निसारमुळे प्रकाशाची कमतरता,वाढीची माहिती मिळू शकेल. {सामरिक आघाडीवर मदत मिळेल काय? होय, या उपग्रहाकडून मिळणाऱ्या हाय रिझोल्यूशन छायाचित्रांमुळे हिमालयातील हिमनद्यांच्या निगराणीत भारत आणि अमेरिकेच्या सरकारला मदत मिळेल. हा चीन आणि पाकिस्तानला लागून भारतीय सीमेवर कडक निगराणी ठेवण्यात सरकारला मदत करू शकतो. {भारतासाठी काय महत्त्वाचे आहे? इस्रोने १९७९ पासून आतापर्यंत ३० पेक्षा जास्त पृथ्वी अवलोकन सॅटेलाइट लाँच केले आहे. याचा उद्देश चांगल्या योजना, कृषी आणि हवामानाशी संबंधित स्पेस इनपूट प्राप्त करणे आहे. निसारमध्ये सिंथेटिक अपर्चर रडार लावला आहे. हा देशाच्या कोणत्याही अन्य उपग्रहांकडून मिळालेल्या छायाचित्रांच्या तुलनेत जास्त हाय रिझोल्युशनची इमेज पाठवेल. यात ढगांच्या मागे व अंधारात पाहण्याची क्षमता आहे.

बातम्या आणखी आहेत...