आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 अमेरिकन शहरांची फसवणूक:नित्यानंदने 'त्या' शहरांसोबत केला 'सिस्टर सिटी' करार; प्रत्यक्षात मात्र 'कैलासा' देशच नाही

वॉशिंग्टन15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
2019 मध्ये बलात्काराच्या आरोपानंतर भारतातून पळून गेलेल्या नित्यानंदने कैलास नावाचा देश स्थापन केल्याचा दावा केला. - Divya Marathi
2019 मध्ये बलात्काराच्या आरोपानंतर भारतातून पळून गेलेल्या नित्यानंदने कैलास नावाचा देश स्थापन केल्याचा दावा केला.

भारतातून फरार झालेल्या स्वामी नित्यानंदच्या कथित देश कैलासने अमेरिकेच्या 30 शहरांची फसवणूक केली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, कैलास या देशाने अमेरिकेतील या तीस शहरांशी सिस्टर सिटी करार केला होता. या सांस्कृतिक करारांतर्गत हे शहर आणि कैलास एकमेकांना विकास कार्यात मदत करतील. यातील धक्कादायक बाब म्हणजे कैलास नावाचा देश जगात नाहीच.

अमेरिकेच्या फॉक्स न्यूजने गुरुवारी एक रिपोर्ट केला. ज्यामध्ये म्हटले आहे की, या यादीत ओहायोमधील डेटनपासून व्हर्जिनियातील रिचमंड आणि फ्लोरिडातील बुएना पार्कपर्यंत अनेक शहरांची नावे आहेत. या सर्व शहरांसोबत झालेल्या करारांबद्दल खुद्द कैलासाच्या वेबसाईटने लिहिले आहे. नित्यानंद यांनी 2019 मध्ये दावा केला होता की, त्यांनी कैलास नावाचा देश स्थापन केला आहे.

कैलासाच्या वेबसाईटचे हे मुखपृष्ठ आहे. यावर, जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत कैलासाच्या शिष्टमंडळाचा अहवाल शीर्षस्थानी आहे.
कैलासाच्या वेबसाईटचे हे मुखपृष्ठ आहे. यावर, जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत कैलासाच्या शिष्टमंडळाचा अहवाल शीर्षस्थानी आहे.

यापूर्वी नेवार्कने आपला करार रद्द केला
अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील नेवार्क या शहराने काही दिवसांपूर्वी कैलास सोबतचा सिस्टर सिटी करार संपवला. नेवार्क आणि काल्पनिक देश 'युनायटेड स्टेट्स ऑफ कैलासा' यांच्यात 12 जानेवारी रोजी एक करार झाला. नेवार्क येथील सिटी हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. पण नेवार्कला कैलास चे वास्तव कळाल्यानंतर त्यांनी आपला करार लागलीच रद्द केला. नेवार्क प्रेस सेक्रेटरी सुझान गारोफालो यांनी या कराराबद्दल खेद व्यक्त केला. ते म्हणाले होते. की, कैलासाच्या परिस्थितीची माहिती मिळताच आम्ही करार रद्द केला. हा करार फसवणुकीने करण्यात आला आहे.

करारानुसार, कैलासाला नेवार्कच्या भगिनी शहराचा दर्जा देण्यात आला.
करारानुसार, कैलासाला नेवार्कच्या भगिनी शहराचा दर्जा देण्यात आला.

अनेक शहरांनी आपली फसवणूक झाल्याचे केले मान्य
फॉक्स न्यूजच्या रिपोर्टमध्ये असे लिहिले आहे की, बनावट बाबाने अनेक शहरांची फसवणूक केली आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की, यापैकी अनेक शहरांनी कैलासने आपली फसवणूक केल्याचे मान्य केले आहे.

नॉर्थ कॅरोलिना शहर जॅक्सनविलने फॉक्स न्यूजला सांगितले की, आम्ही कैलासासोबत कोणत्या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली आहे, ही घोषणा करण्याचा विषय नाही. कैलासाने आम्हाला एक विनंती केली होती, ज्याला आम्ही प्रतिसाद दिला. ही विनंती काय होती हे आम्ही पडताळत नाही. योग्य माहिती गोळा न करता कैलासाशी तडजोड करणे हा शहरांचा दोष असल्याचे फॉक्स न्यूजचे म्हणणे आहे.

सरकारमधील मोठ्या पदांवर बसलेले लोकही फसले
या फसवणुकीला केवळ महापौर आणि नगर परिषद बळी पडली नसून, सरकारमध्ये उच्च पदावर असलेले लोकही या बनावट देशाला बळी पडले आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे. वृत्तानुसार, कैलासाच्या वेबसाइटवर असेही नमूद करण्यात आले आहे की, संसदेच्या दोन सदस्यांनी कैलासाला 'विशेष संसदीय मान्यता' दिली आहे.

त्यांच्यापैकी एक कॅलिफोर्नियातील काँग्रेस वुमन नॉर्मा टोरेस आहेत, जी हाऊस ऍप्रोप्रिएशन कमिटीचा देखील एक भाग आहे. त्याच वेळी, ओहायोमधील रिपब्लिकन पक्षाचे ट्रॉय बाल्डरसन हे दुसरे संसद सदस्य आहेत, ज्यांनी नित्यानंद यांना संसदीय मान्यता दिली.

कैलासा देशाचे हा ध्वज असल्याचा दावा केला जात आहे.
कैलासा देशाचे हा ध्वज असल्याचा दावा केला जात आहे.

नित्यानंद 2019 मध्ये देश सोडून पळून गेला
नित्यानंद यांचा जन्म तामिळनाडूच्या तिरुवन्नमलाई शहरात झाला. त्यांचे नाव अरूणाचलम राजशेखरन असे ठेवण्यात आले होते. असा दावा केला जातो की, त्यांनी वयाच्या 12 व्या वर्षी आध्यात्मिक अनुभव घेण्यास सुरुवात केली. वयाच्या 22 व्या वर्षी त्याला ज्ञान प्राप्त झाले. 2002 मध्ये वयाच्या 24 व्या वर्षी नित्यानंद नावाने लोकांना प्रवचन देण्यास सुरुवात केली. 2003 मध्ये त्यांनी कर्नाटकातील बंगळुरूजवळ बिदाडी येथे ध्यानपीठम नावाचा आश्रम सुरू केला.

2010 मध्ये नित्यानंदवर त्याच्या शिष्याने बलात्काराचा आरोप केला होता. तपासानंतर, 2019 मध्ये, गुजरात पोलिसांनी सांगितले होते की मुलांचे अपहरण करून त्यांना नित्यानंदच्या आश्रमात ठेवले जाते. यानंतर पोलिसांनी छापा टाकून 2 जणांना अटक केली. यानंतर 2019 मध्ये नित्यानंद देश सोडून पळून गेला. डिसेंबर 2019 मध्ये त्यांनी कैलास नावाचे स्वतःचे वेगळे बेट स्थापन करण्याचा आणि वेगळ्या देशाचा दर्जा मिळवण्याचा दावा केला होता. मात्र, आजपर्यंत कोणत्याही देशाने या बेटाला किंवा देशाला मान्यता दिलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...