आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापार्टीगेट प्रकरणात आता ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागणार आहे. 359 कंझर्व्हेटिव्ह खासदारांतील मतदानात जॉन्स पराभूत झाले, तर त्यांची पंतप्रधानपदावरुन उचलबांगडी केली जाईल. पण, त्यात ते जिंकले तर आणखी एक वर्ष आपल्या पदावर कायम राहण्याचा त्यांचा मार्ग मोकळा होईल.
कोरोना महामारीच्या प्रारंभी संपूर्ण ब्रिटनमध्ये लॉकडाऊन व कठोर निर्बंध लागू होते. तेव्हा जॉन्सन यांनी आपल्या निवासस्थानी पार्टी केल्याची बाब उजेडात आली होती. ही घटना ब्रिटनमध्ये पार्टीगेट म्हणून ओळखली जाते.
ब्रिटनच्या 64 टक्के नागरिकांकडून राजीनाम्याची मागणी
पार्टीगेट प्रकरणाचा अहवाल आल्यानंतर ब्रिटनच्या सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 40 हून अधिक खासदारांनी बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना पंतप्रधान आपल्या सरकारी निवासस्थानी पार्ट्या करण्यात व्यस्त होते, असे ते म्हणाले होते. या प्रकरणामुळे ब्रिटनमध्ये संतापाची लाट उसळली होती. MyGov च्या एका सर्व्हेत देशातील 64 टक्के नागरिकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
83 जणांना 126 दंड ठोठावण्यात आले
पार्टीगेट प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांनी 83 जणांवर गुन्हा दाखल केला होता. तसेच त्यांच्यावर 126 प्रकारचे दंडही ठोठावले होते. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, या घोटाळ्यात बहुतांश ज्यूनिअर अधिकाऱ्यांचा समावेश होता.
हे होऊ शकतात नवे पंतप्रधान
बोरिस जॉन्सन यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव पारित झाला, तर त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागेल. त्यांच्या जागी एलिझाबेथ लिज ट्रस यांची नियुक्ती होऊ शकते. ट्रस विद्यमान सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री आहेत. पक्ष कार्यकर्त्यांतही त्या फार लोकप्रिय आहेत. जेरेमी हंट, ऋषी सुनक, नदी जाहवी व पेनी मॉर्डन यांचीही नावे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.