आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानातील राजकीय घटनाक्रम वेगाने बदलत आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वातील सरकार विरोधात सोमवारी संसदेत अविश्वास प्रस्ताव दाखल झाला. त्यावर 31 मार्च रोजी चर्चा व मतदान होणार आहे. तत्पूर्वी, इम्रान यांनी सोमवारी पंजाब प्रांतातील आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेऊन हे पद आघाडी सोडून विरोधकांशी हातमिळवणी करणाऱ्या मित्र पक्षाला दिले आहे. दुसरीकडे, विरोधकांच्या पाकिस्तान डेमोक्रॅटीक फ्रंटने (पीडीएम) नवे पंतप्रधान म्हणून पीएमएल-एन नेते शाहबाज शरीफ यांची निवड केली आहे.
इम्रान सरकार कोसळणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. याची दोन प्रमुख कारणे आहेत. एक -आघाडी व सत्ताधारी पक्षाच्या जवळपास 39 खासदारांनी इम्रान यांची साथ सोडली आहे. दोन -आतापर्यंत पाठिंबा देणाऱ्या लष्करानेही इम्रान यांचा हात झटकला आहे.
पंजाबमध्येच बदल का?
इम्रान यांनी पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी परवेज इलाही यांची नियुक्ती केली आहे. इलाही यांच्याकडे 8 खासदार आहेत. ते स्वबळावर इम्रान यांची खूर्ची वाचवू शकत नाहीत. पण, यामुळे सरकारच्या संख्याबळात काहीशी वाढ होणार आहे. दरम्यान, विरोधकांच्या संख्याबळाचा आकडा 210 च्या आसपास पोहोचला आहे. हा आकडा बहुमताच्या 172 या जादुई आकड्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.
पाकच्या राजकारणाचे अपडेट्स...
इम्रान यांचे शक्तिप्रदर्शन
इम्रान खान यांनी रविवारी राजधानी इस्लामाबादेतील परेड ग्राऊंडमध्ये रॅली आयोजित करुन जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यांनी या रॅलीत 10 लाखांहून अधिक लोक सहभागी होण्याचा दावा केला होता. पण, प्रत्यक्षात त्यांना 1 लाखाचाही गर्दी जमवता आली नाही. यावेळी त्यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसूख घेतले. विरोधक परदेशांतून मिळणाऱ्या पैशाच्या जोरावर आमचे सरकार उलथावून टाकण्याचा कट रचत आहेत. याची आम्हाला कल्पना आहे. पण, आम्ही कुणाची गुलामी करणार नाही, असे ते म्हणाले. जनरल मुशर्रफ यांनी यांनी चोर व दरोडेखोरांची साथ दिली. आम्ही त्यांच्या कर्जाची परतफेड करत आहोत. सरकार पडले तरी चालेल पण, आम्ही गुन्हेगारांना सोडणार नाही, असे इम्रान म्हणाले.
पाक संसदेतील संख्याबळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.