आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबान बदलणार नाही:तालिबानी नेता म्हणाला - अफगाणिस्तानात आता लोकशाही चालणार नाही; आमचे सरकार कसे असेल, हे सांगण्याची गरज नाही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानात सत्ता काबीज करणाऱ्या तालिबानने आपला हेतू जाहीर केला आहे. तालिबानचे नेते वाहिदुल्ला हाशिमी म्हणाला की, अफगाणिस्तानमध्ये कोणतीही लोकशाही व्यवस्था असणार नाही, कारण येथे त्याचे काही अस्तित्व नाही. हाशिमीने वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, तालिबानला अफगाणिस्तान सरकार कसे असेल हे सांगण्याची गरज नाही, कारण हे अगदी स्पष्ट आहे की येथे शरिया कायदा चालेल.

हैबतुल्ला अखुंदजादा होऊ शकतो तालिबानी राजवटीचा प्रमुख

वाहिदुल्लाहचे म्हणणे आहे की, तालिबान अफगाणिस्तान कसे चालवायचे यावर एक रणनीती आखत आहे. आतापर्यंतच्या योजनेनुसार, तालिबानी परिषद अफगाणिस्तानचे कामकाज संभाळू शकते आणि इस्लामिक दहशतवादी चळवळीचा प्रमुख हैबतुल्लाह अखुंदजादा तालिबान राजवटीचा प्रमुख असू शकतो. हाशिमीच्या मते, अखुंदजादा तालिबान परिषदेच्या प्रमुखांपेक्षा वर असेल आणि त्याचा दर्जा देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या बरोबरीचा असेल. अखुंदजादाचा नायब अध्यक्षही राहील.

वाहिदुल्लाहच्या बोलण्यातून हे स्पष्ट होतेय की, तालिबानी राजवट तशीच राहणार आहे जशी मागच्या वेळी 1996 ते 2001 पर्यंत चालू होती. तेव्हा मुल्ला उमर पडद्यामागून तालिबानचे नेतृत्व संभाळत होता.

अफगाणी सैनिकांची भरती करेल तालिबान
तालिबानची योजना नवीन सैन्य तयार करण्याची आहे. यामध्ये तालिबानची भरती करण्याबरोबरच अफगाणिस्तानचे माजी वैमानिक आणि सैनिकांनाही भरती करण्यास सांगितले जाईल. आता तालिबानची ही भरती मोहीम कितपत यशस्वी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण गेल्या 20 वर्षात तालिबानी दहशतवाद्यांनी हजारो सैनिकांना ठार केले आहे आणि अलीकडेच तालिबानने त्या प्रशिक्षण घेतलेल्या अफगाण वैमानिकांनाही लक्ष्य करणे सुरू केले आहे ज्यांना अमेरिकेने ट्रेनिंग दिली होती.

वहिदुल्लाहचे म्हणणे आहे की, बहुतेक अफगाण सैनिकांनी तुर्की, जर्मनी आणि इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्यांना परत येण्यास सांगितले जाईल. आम्ही सैन्यातही काही बदल करू पण तरीही आम्हाला माजी सैनिकांची गरज भासेल. तालिबानला विशेषतः वैमानिकांची गरज आहे कारण त्यांच्याकडे लढाऊ आहेत पण वैमानिक नाहीत.

बातम्या आणखी आहेत...