आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबांगलादेशात राहणारे रोहिंग्या मुस्लिम आपल्या भूमीत म्यानमारमध्ये जाण्यास तयार नाहीत. ऐच्छिक परतीच्या प्रयत्नांबाबत त्यांनी शनिवारी सांगितले की, म्यानमारमध्ये परतल्यावर आम्हाला छावणीत बंद केले जाईल. बांगलादेशमध्ये सुमारे १० लाख रोहिंग्या मुस्लिम म्यानमारच्या सीमेलगत कॉक्स बाजार जिल्हा छावणींत राहत आहेत.
हे लोक लष्कराच्या दडपशाहीनंतर २०१७ मध्ये पळून येथे आले होते. २० रोहिंग्या मुस्लिम निर्वासित आणि ७ बांगलादेशी अधिकाऱ्यांनी रेखाइन राज्यात मोंगडो टाऊनशिप आणि आसपासच्या गावात पुनर्वसन व्यवस्थेची माहिती घेतली. रोहिंग्यांनी परत पाठवण्याच्या तयारीवर नाराजी व्यक्त केली. त्यंानी सांगितले की, सुरक्षेची हमी दिल्याशिवाय आणि नागरिकत्व देणे निश्चित केले जात नाही तोवर परत जाणार नाही. आम्ही स्वत:च्या जमिनीवर स्वत:चे घर बांधू.
अन्य एक निर्वासित अबू सुफियन म्हणाला, म्यानमार आमची जन्मभूमी आहे. आम्ही म्यानमारचे नागरिक आहोत आणि नागरिकत्व घेऊनच परतू. रोहिंग्यांना दिले जात असलेले नॅशनल व्हेरिफिकेशन कार्ड(एनव्हीसी) आम्हाला मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.