आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चेतून होईल चर्चा:मोबाइल-लॅपटॉपसारखे गॅजेट नाही, संकोचामुळे प्रवासात लोक अनोळखी व्यक्तींशी बोलत नाहीत

शिकागोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बस, ट्रेन, मेट्रोमध्ये प्रवास करणारे किंवा वेटिंग हॉलमध्ये मोबाइल-लॅपटॉप, वर्तमानपत्र आणि पुस्तके वाचताना लोक दिसून येतात. लोकांनी अनोळखी लोकांशी बोलणे बंद केले आहे. एका सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, प्रतीक्षालयात फक्त ७% लोक अनोळखी लोकांशी बोलतात. ट्रेन-मेट्रोमध्ये केवळ २४% लोकांनी अनोळखी लोकांच्या आरोग्याची चौकशी केली.

शिकागो विद्यापीठातील शास्त्रज्ञ नोकोलस ऍपली आणि त्यांच्या टीमने यावर संशोधन केले. ते म्हणतात की, सामाजिक संवाद म्हणजे लोकांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे आपल्याला अधिक आनंदी करते; परंतु लोक अनोळखी व्यक्तींशी बोलण्यास कचरतात. अज्ञात व्यक्तीची प्रतिक्रिया काय असेल याची त्यांना भीती वाटते. अशा परिस्थितीत लोक रेल्वे, प्रतीक्षालय यासारख्या सार्वजनिक ठिकाणी मोबाइल-लॅपटॉपमध्ये व्यग्र असल्याचे दिसून येते. मोबाइल-लॅपटॉपचे व्यसन हे लोकांशी न बोलण्याचे कारण नाही. संशोधनातून समोर आले की, लोक एकमेकांशी बोलून खूप काही शिकू शकतील. अनोळखी लोकांची वेगळी विशेषत:, त्यांचे अनुभव वेगवेगळे असतात. अनोळखी लोकांशी न बोलल्याने खूप काही गमावतो. संशोधनात आणखी एक गोष्ट आढळून आली ती म्हणजे अनोळखी लोकांकडून मिळालेल्या औपचारिक गोष्टी तुम्हाला फार काही शिकवत नाहीत पण आनंदी ठेवतात. फोनवर मेसेज पाठवण्यापेक्षा बोलण्याचा प्रभाव पडतो.

अनोळखी व्यक्तीशी संभाषण नैराश्य घालवण्यास फायदेशीर अनोळखी व्यक्तीने केलेली प्रशंसा ओळखीच्या व्यक्तीच्या प्रशंसेपेक्षा अधिक परिणाम करते. दीर्घकाळ आनंदी राहते. अगदी नैराश्यातून बाहेर येण्यास मदत होते. पण गर्दीत किंवा समूहात अलिप्त राहणे ही एक प्रकारची विकृती आहे.

बातम्या आणखी आहेत...