आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • No Matter The Age Of A Person, The Liver Stays Young For 3 Years, But Toxic Substances Like Alcohol Should Be Avoided

संशोधन:माणसाचे वय काहीही असले तरी यकृत 3 वर्षे राहते तरुण, पण मद्यपानासारखे विषारी पदार्थ टाळावेत

बर्लिनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वयाचा कोणताही टप्पा असला तरी आपले यकृत तीन वर्षे तरुण राहू शकते. शरीराचे उर्वरित अवयव मात्र वृद्ध होतात. मेथोमेटिकल मॉडेलिंग व रेट्रोस्पेक्टिव्ह रेडिओकार्बन वर्थ डेटिंग तंत्रज्ञानाच्या साह्याने ही बाब समोर आली आहे. २० व्या शतकात आण्विक चाचणीनंतर वातावरणात मिसळणारे कार्बन आयसोटोपच्या आधारे संशोधकांना काही तथ्ये मिळाली. वृद्धत्वाकडे झुकताना आपल्या यकृतावर त्याचे परिणाम दिसत नाहीत. परंतु यकृतात विषारी पदार्थ जाऊ नये, हे पथ्य पाळले गेले पाहिजे. कारण यातील विष शरीरावर परिणाम करते. हानी झालेली असताना स्वत:ला बरे करण्याची अनोखी शक्ती यकृतात असते. जर्मनीतील ड्रेसडेन विद्यापीठातील संशोधक ओलाफा बर्गमॅन म्हणाले, तुम्ही विशीतील आहात की ऐंशीतील. त्याचा काही फरक पडत नाही. कारण तुमचे यकृत सरासरी वयाच्या तीन वर्षांनी लहान असते. संशोधकांच्या टीमने २० ते ८४ या वयोगटातील ५० लोकांचा अभ्यास केला. त्यात त्यांची उत्तरीय तपासणी अहवाल व बायोप्सीतील नमुन्यांचे विश्लेषण केले. जुन्या पेशींची जागा नव्या पेशी घेतात. हे काम यकृत सहजपणे करते. यकृताचा एक छोटा भागदेखील १० वर्षे जिवंत राहू शकतो. विशिष्ट लिव्हिर सेलची तुलना डीएनएने समृद्ध यकृताशी केल्यास नूतनीकरणात मूलभूत फरक दिसून आला, असे बर्गमॅन यांनी सांगितले. विशिष्ट पेशी वर्षभरात नूतन होतात.

बातम्या आणखी आहेत...