आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • No Need For Headphones Anymore, New Brain Chips Will Make You Hear Music Right In The Brain: Alan Musk

दिव्य मराठी विशेष:आता हेडफोनची गरजच नाही, नवीन ब्रेन चिपने मधुर संगीताची जाणीव थेट मेंदूला होईल : अॅलन मस्क

न्यूयॉर्क2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • मेंदू कॉम्प्युटरला जोडणाऱ्या तंत्राची टेस्लाचे सीईओ 28 ऑगस्टला करणार घोषणा
  • कानाच्या मागून कनेक्ट असेल चिप, स्मार्टफोनवर मिळेल माहिती

जगातील प्रख्यात कंपन्यांपैकी एक टेस्लाचे सीईओ अॅलन मस्क यांचे न्यूरालिंक ब्रेन इम्प्लांट तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास जगातून हेडफोनसारखी वस्तू नाहीशी होईल. अॅलन मस्क सध्या न्यूरालिंक प्रकल्पाला निधी पुरवत आहे. याअंतर्गत माणसाच्या मेंदूत बसवता येईल असे कॉम्प्युटर तयार केले जात आहे. ते एका चिपच्या आकाराएवढे असेल. संगणक तज्ञ ऑस्टिन हॉवर्ड यांच्याशी ट्विटरवरील चर्चेदरम्यान मस्क यांनी या उपकरणाद्वारे संगीताची जाणीव थेट मेंदूला होईल, असा दावा केला आहे. हे उपकरण कुठल्याही प्रकारचे व्यसन आणि तणावातून मुक्त करण्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. एक इंच एवढा आकार असलेली ही चिप शस्त्रक्रिया करून बसवली जाऊ शकते. २८ ऑगस्टला कंपनीच्या एका सोहळ्यात ती लाँच केली जाऊ शकते.

अॅलन मस्क यांनी २०१६ मध्ये न्यूरालिंक नावाचा प्रकल्प सुरू केला होता. याअंतर्गत अत्यंत सूक्ष्म आणि लवचिक थ्रेड्स डिझाइन करण्यात आले होते. ते माणसाच्या केसांच्या तुलनेत दहापट पातळ होते. तसेच हे थ्रेड मेंदूत बसवले जाऊ शकतात. ही चिप हजारो मायक्रोस्कोपिक थ्रेडशी जोडलेली असेल. मस्क यांच्या दाव्यानुसार, या ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस टेक्नॉलॉजीच्या मदतीने अनेक प्रकारच्या न्यूरोलॉजिकल आजारांवरील उपचार सुलभ होतील. तसेच हे उपकरण अर्धांगवायू आणि पाठीच्या कण्याच्या दुखापतीसाठी वरदान ठरेल. न्यूरालिंकचा उपयोग कोणतेही व्यसन किंवा नैराश्याला कारणीभूत असलेल्या मेंदूच्या भागास पुन्हा प्रशिक्षण देण्यासाठी करता येईल का? असे ट्विटरवर प्रणय पथोलेने विचारल्यावर यावर मस्क म्हणाले, हो, नक्कीच. सोबतच या तंत्राचा वापर अल्झायमर आणि पार्किसन्ससारख्या आजाराने ग्रस्त लोकांचे जीवन सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो. माकड आणि उंदरांवर चाचण्या यशस्वी झाल्यानंतर आता या आगळ्यावेगळ्या तंत्रज्ञानाची मानवी चाचणी अंतिम टप्प्यात आहे.

कानाच्या मागून कनेक्ट असेल चिप, स्मार्टफोनवर मिळेल माहिती

न्यूरालिंक तंत्रज्ञान अल्ट्राथिन थ्रेड्सद्वारे मानवाच्या मेंदूत इलेक्ट्रॉड्स इम्प्लांट करण्याशी संबंधित आहे. हे माणसाच्या मेंदूशी चिप्स आणि थ्रेड्सद्वारे जोडलेले असेल. तसेच ही चिप रिमूव्हेबवल पॉडशी जोडलेली असेल. जी कानाच्या मागे फिट केलेली असेल. तसेच वायरलेसने दुसऱ्या डिव्हाइसशीही कनेक्ट केेले जाईल. विशेष म्हणजे याद्वारे मेंदूतील माहितीची थेट स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरमध्ये नोंंद होईल.

बातम्या आणखी आहेत...