आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका:निवडणुकीनंतर सत्ता साेपवण्याची गरज भासणार नाही : डोनाल्ड ट्रम्प

वाॅशिंग्टन7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी गिन्सबर्ग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. - Divya Marathi
गुरुवारी गिन्सबर्ग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
  • सत्ता साेपवणे लाेकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो : मिट राेमनी

अमेरिकी निवडणुकीत पाेस्टल बॅलेटद्वारे मतदान प्रक्रियेबाबत अनेक वेळा प्रश्न उपस्थित करणारे राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नाेव्हेंबरमध्ये निवडणुकीनंतर शांततामय मार्गाने सत्तेचे हस्तांतरण करण्याचे मी आश्वासन देऊ शकत नाही. मतदानाबद्दल मला वाटणाऱ्या चिंतेविषयी आधीच बाेललाे आहे.

बघूया पुढे काय हाेते ते. तसे पाहिले तर सत्ता साेपवण्याची गरज भासणार नाही, असे मला वाटते. आता असलेली सत्ता पुढेही राहील, असा दावाही ट्रम्प यांनी केला.बुधवारी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान सत्तेच्या हस्तांतरणासंबंधी प्रश्नावर ही भूमिका मांडली. देशात मतदान प्रक्रियेत व्यापक पातळीवर घाेटाळा हाेईल, असा इशारा ट्रम्प यांनी याआधीही अनेक वेळा दिला. त्याचबराेबर त्यांनी सुरुवातीपासूनच मेल इन बॅलेटला विराेध केला आहे. मधल्या काळात त्यांनी या प्रक्रियेला काही अटींसह समर्थन असल्याचे म्हटले हाेते. सत्ता हस्तांतरणावरील ट्रम्प यांचे हे विधान पहिल्यांदा जाहीर झालेले नाही. जुलैमध्ये एका मुलाखतीत त्यांनी निवडणुकीनंतरच्या परिस्थितीबाबत निश्चितपणे काही सांगू शकत नसल्याचे सांगितले हाेते.

मेल इन बॅलेट एक प्रकारचे संकट, ट्रम्प यांनी व्यक्त केली पुन्हा भीती
अमेरिकेच्या निवडणुकीत पाेस्टल मतदान हे एक प्रकारचे संकट आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. काेराेनामुळे त्याचा वापर वाढणार आहे. परंतु अशा प्रकारच्या मतदानावर माझा तीव्र आक्षेप राहिला आहे, हे तुम्ही जाणून आहात, असे ट्रम्प यांनी सांगितले. वास्तविक अशा प्रकारच्या प्रक्रियेत घाेटाळा हाेत असल्याचे काही पुरावे नाहीत. असे असले तरी त्यावरून मतभेद आहेत.

सत्ता साेपवणे लाेकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो : मिट राेमनी
सत्ता साेपवण्याबाबतच्या ट्रम्प यांच्या वक्तव्याचे त्यांच्या पक्षातील लाेकही समर्थन करणार नाहीत, असा टाेला ट्रम्प यांचे सहकारी मिट राेमनी यांनी लगावला. लाेकशाहीत शांततेच्या मार्गाने सत्ता साेपवणे आवश्यक असते. ही अमेरिका आहे, बेलारूस नव्हे. राष्ट्राध्यक्ष या नात्याने ट्रम्प यांनी त्यांचा गाैरव व जबाबदाऱ्यांना आेळखून वागायला हवे. रोमनी यांनी आक्रमक प्रचार सुरू केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीवरूनही वादंग सुरू
सर्वाेच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रुथ गिन्सबर्ग (८७) यांचा अलीकडेच मृत्यू झाला. गुरुवारी सर्वाेच्च न्यायालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या जागी नवीन नियुक्ती झाली आहे. त्यावरून वादंग निर्माण झाले आहे. नवीन जजची नियुक्ती निवडणुकीनंतर व्हावी, असे डेमाेक्रॅट्सच्या सदस्यांचे म्हणणे आहे. परंतु ट्रम्प यांना ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. कारण निवडणुकीनंतर एखादा खटला आल्यास नवीन जज त्यांच्या बाजूने असावेत, असा उद्देश आहे.

बातम्या आणखी आहेत...