आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना चव, ना रंग तरीही 1.64 लाखात 450 ग्रॅम विकला:हा मासा, इतका दुर्मिळ की रात्रीच्या अंधारातच आढळून येतो

हाँगकाँग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेबी वाम माशाच्या एका पाउंडची (४५० ग्रॅम) किंमत १.६४ लाख रुपये आहे. याला ना कोणता रंग आहे आणि ना कोणती चव. मात्र, जपानमध्ये याला मोठी मागणी आहे. काही जपानी व्यंजने व सुशी रेस्टॉरंटमध्ये तो मोठ्या प्रमाणात वापरला जातो. गेल्या वर्षी २०२२ मध्ये तैवानने ४७८ कोटी रुपयांच्या बेबी वाम माशाची निर्यात केली आहे. तो दुर्मिळ असणे हेच त्याचे महाग असण्यामागचे मोठे कारण आहे. त्याला इतकी मागणी आहे की, पुरवठाही पूर्ण होत नाही. रात्रीच्या अंधारातच तो दिसतो.