आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुक्रेन युद्धाचा परिणाम भारत-रशिया यांच्यातील वार्षिक शिखर परिषदेवर पडू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षी रशियात जाणार नाहीत. प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, रशियन राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनच्या युद्धात अण्वस्त्र वापराबाबत दिलेल्या धमकीनंतर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत वार्षिक वैयक्तिक शिखर परिषदेचे आयोजन करणार नाहीत.
अधिकारी म्हणाला की, भारत-रशियातील संबंध बळकट आहेत. मात्र, सध्या मैत्रीचे ढोंग करणे मोदींसाठी फायद्याचे ठरण्याची शक्यता नाही. रशियन सरकारचे प्रवक्ते दमित्री पेस्कोव्ह यांनी पुतीन-मोदी शिखर परिषदेच्या शक्यतांबाबत सांगितले की, ही या वर्षी होणार नाही. दोन्ही देशांचे नेते दुसऱ्यांदा भेटणार नाहीत : भारत-रशिया वार्षिक परिषद एका धोरणात्मक भागीदारीचा सर्वोच्च मंच आहे. आतापर्यंत या मंचाच्या २१ बैठका झाल्या आहेत. २००० नंतर ही दुसरीच वेळ असेल, जेव्हा भारत व रशियाचे नेते समोरासमोर भेटणार नाहीत. साधारण डिसेंबरमध्ये आयोजित होणारी ही परिषद फक्त एकदा २०२० मध्ये कोरोनामुळे ऱद्द झाली हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.