आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांचे ग्रीन कार्ड मिळवण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. प्रतिनिधी सभागृहात स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी ईगल अॅक्ट मतदानाआधीच फेटाळले. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांच्या मोठ्या गटाने त्याला विरोध दर्शवला. त्यांनी सांगितले की, अधिनियम लागू झाल्यास अनेक देशांना भेदभावाचा सामना करावा लागेल.
ज्या देशांत कामगार वर्ग कमकुवत आहे, त्यांना येथे आणण्याची संधी मिळणार नाही. रिपब्लिकन नेते रिप जिम बँक्स म्हणाले, घुसखोरी करणाऱ्या स्थलांतरितांना रोखून अॅक्टवर विचार व्हावा. लॉकडाऊनमध्ये अमेरिकींच्या नोकऱ्या गेल्या. आता बाहेरचे लोक येथे नोकरी करणार असतील तर कसे होईल. डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते यवेटे क्लार्क म्हणाले, ईगल अॅक्ट मंजूर झाल्याने भारत आणि चीनचे लोक जास्त प्रभावी होण्याचा धोका आहे.
बायडेन यांनी अध्यादेश आणण्याची मागणी : अमेरिकेत राहणारे भारतीय राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडे ईगल अॅक्टचा अध्यादे आणण्याची मागणी करत आहेत. तसे झाल्यास प्रकरण कोर्टात जाऊ शकते. येथे कार्यरत डॉक्टर राज म्हणाले, अमेरिकेत भारतीयांसोबत खूप भेदभाव होतो. मी कॅनडा किंवा भारतात जाण्याचा विचार करतोय.
कंपन्यांना विधेयक मंजूर झाल्यास नुकसान : इमिग्रेशन व्हॉइसच्या एका सूत्रांनी सांगितले की, विधेयक मंजूर व्हावे,असे मोठ्या टेक कंपन्यांना वाटत नाही. भारतीयांना ग्रीन कार्ड मिळल्यावर वेतन वाढेल आणि ते सहज अन्य कंपनीत जाऊ जाण्याचा धोका त्यांना वाटतो.
अधिनियमात राजकारण सभागृहात ईगल अॅक्टवर मतदान होणार नसल्याचा निर्णय झाल्यानंतर अनेक देशांतील लोकांनी विधेयकाच्या समर्थक नेत्यांना फोन करणे सुरू केले. विधेयकाच्या समर्थक मानणाऱ्या डेमोक्रॅटिक नेत्या जोई लोफग्रेन यांच्यावर इमिग्रेशन व्हॉइस नामक संघटनेने आरोप केला की, त्यांनी वेळेत विधेयक सादर केले नाही. सभागृहाचे अधिवेशन संपावे यासाठी जाणीवपूर्वक यात विलंब कला.त्या पेलोसींच्या निकटवर्तीय आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.