आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • No Work No Pay । Japan । One Minute Delay On Train In Japan, Pay Cut; Driver Angry Over Rs 28 Deduction: 'It's Not My Fault'

नो वर्क नो पे:जपानमध्ये रेल्वेला एक मिनिट उशीर, वेतन कापले; 28 रुपये कापल्याने चालक नाराज ही‘माझी चूक नाही’

टोकियो23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेळेच्या बाबतीत अतिशय शिस्त पाळणारा देश अशी जपानची आेळख आहे. मात्र जपानमध्ये एक अनाेखे प्रकरण समाेर आले आहे. जपानमध्ये एक रेल्वे मिनिटभर उशिरा स्थानकात दाखल झाली. त्यामुळे कंपनीने चालकाच्या वेतनातून २८ रुपये कापले.

या निर्णयाच्या विराेधात चालकाने जपान रेल्वे कंपनीच्या विराेधात १४ लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली. विलंबामागे आपण कारणीभूत नसल्याचे चालकाचे म्हणणे आहे. त्यामुळे कंपनीला १४ लाख रुपयांच्या दंडासाेबत वेतनातून कापण्यात आलेल्या २८ रुपयांसह साडेआठ रुपयांचा ओव्हर टाइम देखील मिळावा, असे त्याचे म्हणणे आहे.

स्थानिक वृत्तपत्रानुसार चालकास रेल्वेस ओकायामा स्थानकावर नेण्याचे आदेश देण्यात आले. चालक ट्रेनला घेऊन ओकायामा स्थानकावर दाखल झाला तेव्हा ताे चुकीच्या फलाटावर होता. त्याने नियंत्रण कक्षाकडून त्याची पडताळणी केली. त्यानंतर त्यास फलाट बदलण्याची सूचना मिळाल्यानंतर त्यात एक मिनिटाचा विलंब झाला हाेता.

विलंब झाल्यास कंपनीसाठी दिलगिरी अनिवार्य

जपानमध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वे किंवा बसला नियाेजित ठिकाणी पाेहाेचण्यास विलंब झाल्यास कंपनीला प्रवाशांची क्षमायाचना करावी लागते. रेल्वेला टाेकियाेची लाइफलाइन म्हटले जाते. राेज लाखाे लाेक यातून प्रवास करतात.

त्यामुळे एखाद्या मिनिटाचा विलंब झाला तरी चाकरमान्यांसह प्रवाशांना पुढील गाडी मिळत नाही. म्हणूनच ट्रेन कंपन्या कर्मचाऱ्यांबाबत कठाेर आहेत. विलंब झाल्यास नाे वर्क नाे पेचा फार्म्युला लागू करून संबंधित कर्मचाऱ्याच्या वेतनात कपात केली जाते.

बातम्या आणखी आहेत...