आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
2020 च्या भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यावर्षी अमेरिकेतील रोजर पेनरोज, रीनहार्ड गेंजेल आणि एंड्रिया गेज यांना यंदाचा नोबेल दिला जाईल. रोजर पेनरोज यांना अल्बर्ट आइंस्टीनच्या जनरल थेअरी ऑफ रिलेटिविटीबाबतची माहिती मिळवण्यासाठी मॅथेमेटिकल मेथड तयार केल्याबद्दल नोबेल दिला जाईल. तर, गेंजेल आणि गेज यांना एकत्रितपणे ब्लॅक होल आणि मिल्की वे चे रहस्य उलगडण्यासाठी नोबेल दिला जाईल.
1901 पासून आतापर्यंत 113 वेळा 212 शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील नोबेल देण्यात आला आहे. जॉन बार्डीन यांना दोन वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांना एकदा ट्रांजिस्टर आणि दुसऱ्यांना सुपर कंडक्टिविटीशी संबंधित कामासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
एक नोबेल जास्तीत जास्त तिघांना देता येतो
एक नोबेल पुरस्कार जास्तीत जास्त तीन विद्वानांना त्यांच्या दोन कामांसाठी दिला जाऊ शकतो. पहिल्या वर्ल्ड वॉर आणि दुसऱ्या वर्ल्ड वॉरमुळे 6 वेळा फिजिक्सचे नोबेल कोणालाच देण्यात आले नव्हते.
नोबेल पुरस्काराचा इतिहास
नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. त्यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 10 डिसेंबरला हे पुरस्कार दिले जातात. वैद्यकशास्त्राशिवाय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या विषयांतही नोबेल दिले जाते. अर्थशास्त्रातील नोबेल 1968 मध्ये सुरू झाला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.