आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबेलारूसमधील न्यायालयाने शुक्रवारी नोबेल शांतता पारितोषिक विजेते एलेस बिलियात्स्की यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यांच्याशिवाय आणखी तीन जणांना सरकारविरोधातील निदर्शनांना फंडिंग केल्याप्रकरणी शिक्षा झाली आहे.
2020 मध्ये झालेल्या निदर्शनांनंतर सरकारने चौघांना अटक केली होती. बेलारुसचे अध्यक्ष म्हणून अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या निवडीविरोधात ते निषेध करत होते. लुकाशेन्को 1994 पासून राष्ट्राध्यक्ष आहेत. बेकायदेशीर मार्गाने विरोधी पक्ष कमकुवत करून ते पुन्हा पुन्हा सत्तेत येतात, असे आरोप त्यांच्यावर होत आहेत.
2022 मध्ये मिळाला होता शांततेचा जगातील सर्वात मोठा पुरस्कार
गेल्या वर्षी 2022 मध्ये नोबेल समितीने त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला होता. समितीने म्हटले आहे की, बेलारूस सरकारने त्यांचा निषेध दडपण्याचा वर्षानुवर्षे प्रयत्न केला, त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले, त्यांची नोकरीही हिसकावून घेण्यात आली होती.
देशाबाहेर राहणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्या स्वेतलाना यांनी एलेस यांना झालेली शिक्षा लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.
पुतीन यांचे मित्र आहेत बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को
लुकाशेन्को यांना सत्तेतून बाहेर काढल्याबद्दल एलेस यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. लुकाशेन्को यांना पुतीन यांच्या जवळचे मानले जाते. युक्रेन युद्धातही ते उघडपणे रशियाला पाठिंबा देत आहेत. लुकाशेन्को यांच्यावर आरोप आहेत की, त्यांनी आतापर्यंत 1458 राजकीय कैद्यांना बेकायदेशीर मार्गाने तुरुंगात ठेवले आहे. लुकाशेन्को हे युरोपचे शेवटचे हुकूमशहा म्हणून प्रसिद्ध आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.