आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शांततेचे नोबेल जाहीर:एका वर्षात 88 देशातील 9.7 कोटी लोकांपर्यंत मदत पोहचवणाऱ्या यूएनच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामला यंदाचा शांततेचा नोबेल जाहीर

स्टॉकहोम19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्ल्ड फूड प्रोग्राम संघटना (डब्लूएफपी) ला या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. नॉर्वेच्या नोबेल कमेटीच्या अध्यक्षा बेरिट राइस एंडर्सन यांनी शुक्रवारी नोबेल शांती पुरस्काराची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, 2019 मध्ये 88 देशांच्या 9.7 कोटी लोकांपर्यंत वर्ल्ड फूड प्रोग्रामची मदत झाली आहे.

वर्ल्ड फूड प्रोग्राम ही भूक निर्मूलन आणि जगभरात अन्नसुरक्षेस प्रोत्साहन देण्यारी सर्वात मोठी संस्था आहे. कोरोना काळात जगभरातील गरजूंना मदत करण्यात या संस्थेनेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कोरोना महामारीच्या काळात वर्ल्ड फूड प्रोग्रामची जबाबदारी आणखी वाढली आहे, कारण उपासमारीने झगडणार्‍या लोकांच्या संख्येत सध्या लक्षणीय वाढ झाली आहे. संस्थेचे म्हणने आहे की, लस येईपर्यंत अन्न ही सर्वात चांगली लस आहे.

वर्ल्ड फूड प्रोग्राम संघटना काय आहे ?

वर्ल्ड फूड प्रोग्राम संघटना संयुक्त राष्ट्र (यूनाइटेड नेशंस) च्या फूड प्रोग्रामशी संबंधित एक शाखा आहे. ही जगातील सर्वार मोठी संघटना असून, याद्वारे गरजूंना अन्न पुरवले जाते.