आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोबेल नामांकन:डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन, इस्त्राईल-युएई दरम्यान झालेल्या करारासाठी पुरस्कार देण्याची नार्वेच्या खासदारांची शिफारस

वॉशिंग्टन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो 13 ऑगस्टच्या बैठकीचा आहे ज्यामध्ये ट्रम्प यांनी इस्राईल आणि युएई दरम्यान करार केला होता. या करारासाठी त्यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची शिफारस करण्यात आली आहे. -फाइल फोटो - Divya Marathi
हा फोटो 13 ऑगस्टच्या बैठकीचा आहे ज्यामध्ये ट्रम्प यांनी इस्राईल आणि युएई दरम्यान करार केला होता. या करारासाठी त्यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची शिफारस करण्यात आली आहे. -फाइल फोटो
  • अमेरिकेच्या चार राष्ट्रपतींना हा पुरस्कार मिळाला आहे

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना 2021 साठीच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. फॉक्स न्यूजनुसार, नॉर्वेचे खासदार ख्रिस्चियन टिबरिंग गेये यांनी ट्रम्प यांना पुरस्कार देण्यासाठी नोबेल समितीला पत्र लिहिले आहे. युएई आणि इस्रायलमध्ये शांतता करार करण्यासाठी ट्रम्प यांना हा पुरस्कार देण्याची शिफारस केली आहे. यापूर्वी 2018 मध्ये ट्रम्प यांना उत्तर कोरियाबरोबरचा वाद मिटविण्यासाठी पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले होते.

गे यांनी पत्रात लिहिले, "युएई आणि इस्त्राईल यांच्यातील शांतता करारानंतर मध्य पूर्वेतील अन्य देशही असे करतील अशी आशा आहे. हा करार गेम चेंजर असेल. यामुळे संपूर्ण क्षेत्रात परस्पर सहकार्य आणि समृद्धी वाढेल."

गेये म्हणाले - नोबेल समिती तथ्यांवर विचार करावा

गेये म्हणाले की, "मी ट्रम्प यांचा मोठा समर्थक नाही रंतु इतर नेत्यांनी निर्णय घेण्याच्या दृष्टीने ट्रम्प यांचे अनुसरण केले पाहिजे. समितीने पुरस्कार देताना तथ्य विचारात घ्यावे. कधीकधी ते कसे वागतात ते विचारात घेऊ नये. मला वाटते की ट्रम्प यांनीही देशांमधील शांततेसाठी नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामित झालेल्या इतर नामांकितांसारखेच काम केले आहे. अलिकडच्या वर्षांत ज्यांनी शांतता पुरस्कार जिंकला आहे त्यांनी ट्रम्पपेक्षा खूपच कमी काम केले आहे. उदाहरणार्थ, बराक ओबामा यांनी काहीही केले नाही."

अमेरिकेच्या चार राष्ट्रपतींना हा पुरस्कार मिळाला आहे

आतापर्यंत अमेरिकेच्या चार राष्ट्रपतींना नोबेल शांतता पुरस्कार भेटला आहे. 1906 मध्ये थिओडोर रूजवेल्ट, 1919 मध्ये वूडो विल्सन, 2020 मध्ये जिमी कार्टर आणि 2009 मध्ये बराक ओबामा यांनी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ओबामा यांना आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी बळकट करण्यासाठी आणि लोकांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...