आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्वीडनच्या नोबेल कमेटीने बुधवारी रसायनशास्त्रातील नोबेलची घोषणा केली. यंदाचा नोबेल दोन महिला शास्त्रज्ञ इमैनुएल कारपेंतिए आणि जेनिफर डौडना यांना जाहीर झाला आहे. या दोन महिला शास्त्रज्ञांनी जेनेटिक सीजरचा महत्वपूर्ण शोध लावला आहे. या शोधाद्वारे जनावरे, झाडे, मायक्रोऑर्गेनिज्मच्या डीएनएमध्ये बदल करुन गंभीर आजारांवर उपचार करणे शक्य होईल. कारपेंतिए बर्लिनमधील मॅक्स प्लांक यूनिट फॉर सायंस ऑफ पेथोजंसच्या डायरेक्टर आहेत आणि डौडना यूनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये कार्यरत आहेत. यापूर्वीच 5 ऑक्टोबरला वैद्यकशास्त्रातील आणि 6 ऑक्टोबरला भौतिकशास्त्रातील नोबलची घोषणा झाली आहे.
2020 Chemistry Laureates Emmanuelle Charpentier and Jennifer Doudna discovered one of gene technology’s sharpest tools: the CRISPR/Cas9 genetic scissors. Using these, researchers can change the DNA of animals, plants and microorganisms with extremely high precision.#NobelPrize pic.twitter.com/BHwD9ktsRU
— The Nobel Prize (@NobelPrize) October 7, 2020
जीन टेक्नोलॉजीमध्ये महत्वाचे योगदान
कारपेंतिए आणि डौडनाने जीन टेक्नोलॉजीसाठी महत्वाचे असलेल्या CRISPR/Cas9 विकसित केले आहे. याला जेनेटिक सीजर्स नाव देण्यात आले आहे. याद्वारे जनावरे, झाडे आणि सूक्ष्मजीवांच्या डीएनएमध्ये बदल करता येईल. यातून कँसरसह अनेक गंभीर आणि अनुवंशिक आजारांवर उपचार करणे शक्य होईल.
मेरी क्यूरी यांना फिजिक्स-केमिस्ट्री या दोन्ही विषयात नोबेल
नोबेलच्या इतिहासात मेरी क्यूरी एकमेव शास्त्रज्ञ आहेत, ज्यांना 2 वेळा विविध विषयांसाठी नोबल मिळाला आहे. 1903 मध्ये मेरी यांना त्यांचे पती पियरे क्यूरी आणि हेनरी बॅक्वेरलसोबत रेडियो एक्टिविटी (भौतिकी)साठी नोबेल मिळाला होता. त्यानंतर 1911 मध्ये रेडियमच्या शोधासाठी रसायनशास्त्रातील नोबेल मिळाला.
रसायनसास्त्रातील नोबलमधील महत्वाच्या गोष्टी
1901 ते 2019 दरम्यान केमिस्ट्रीमध्ये 111 नोबेल पुरस्कार देण्यात आले.
63 वेळा पुरस्कार फक्त एका शास्त्रज्ञाला देण्यात आला.
आतापर्यंत 5 महिलांना केमिस्ट्रीमधील नोबेल मिळाला आहे.
फ्रेडरिक सेंगर एकमेव शास्त्रज्ञ आहेत, ज्यांना (1958 आणि 1980) मध्ये दोनवेळा केमिस्ट्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
फ्रेडरिक जूलियट नोबेल मिळवणारे सर्वात तरुण शास्त्रज्ञ होते. 1935 मध्ये पुरस्कार मिळाला, तेव्हा त्यांचे वय 35 वर्षे होते.
फ्रेडरिक यांना त्यांची पत्नी आणि मेरी क्यूरी यांची मुलगी आइरिनसोबत एकत्रितपणे नोबेल मिळाला आहे.
जॉन बी गुडइनफ हे नोबेल मिळवणारे सर्वात वयस्कर शास्त्रज्ञ होते. पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांचे वय 97 वर्षे होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.