आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Nobel Prize In Physiology Medicine 2020 Announcement: Harvey J Alter, Michael Houghton, Charles M Rice

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैद्यकशास्त्रातील नोबेलची घोषणा:हॅपेटायटिस सी व्हायरसचा शोध लावणाऱ्या हार्वे आल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स राइस यांना यंदाचा नोबेल जाहीर

स्टॉकहोम7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षीच्या पहिल्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे. वैद्यकशास्त्रातील नोबेल एकत्रितपणे तीन शास्त्रज्ञांना दिला जात आहे. यात हार्वे जे आल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम राइस यांचा समावेश आहे. या तिघांनी हॅपेटायटिस सी व्हायरसचा शोध लावला आहे.

वैद्यकशास्त्रातील नोबेल विजेत्यांची निवड स्वीडनच्या कॅरोलिंस्का इंस्टीट्यूटच्या 5 सदस्यांच्या कमेटी करते. पुरस्कारात त्यांना 10 लाख स्वीडिश क्रोनर (भारतीय रुपयांमध्ये 8.22 कोटी रुपये) दिले जातात.

नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. डायनामाइटचा शोध लावणारे​​​​​​ स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. त्यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच 10 डिसेंबरला हे पुरस्कार दिले जातात. वैद्यकशास्त्राशिवाय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या विषयांतही नोबेल दिले जाते. अर्थशास्त्रातील नोबेल 1968 मध्ये सुरू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...