आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

साहित्यातील नोबेलची घोषणा:अमेरिकन कवयित्री लुईस ग्लूक यांना यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर

स्टॉकहोम20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वीडिश नोबेल कमेटीने गुरुवारी अमेरिकन कवयत्री लुइज ग्लूक (77) यांना या वर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर केला आहे. मागील 3 दिवसात वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रातील नोबेलची घोषणा झाली आहे. हे सर्व पुरस्कार अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजेच 10 डिसेंबरला स्टॉकहोममध्ये दिले जातील.

1943 साली न्यूयॉर्कमध्ये जन्म झालेल्या ग्लूक केंब्रिज (मैसाच्युसेट्स) मध्ये राहतात. कविताशिवाय त्या येल यूनिव्हर्सिटीमध्ये इंग्रजीच्या प्राध्यापीका आहेत. 1968 मध्ये लुइस यांचे पहिले पुस्तक फर्स्टबोर्न प्रकाशित झाले होते. यानंतर त्या अमेरिकेतील एक प्रख्यात समकालीन साहित्यिक बनल्या. लुइस यांच्या कवितेचे 12 संग्रह प्रकाशित झाले आहेत, तसेच त्यांनी अनेक निबंधही लिहीले आहेत. लुइस कवितेतील स्वच्छतेसाठी ओळखल्या जातात. त्यांनी लहानपण, कौटुंबिक आयुष्य, आई-वडिलांचे मुलांसोबतचे नाते अशा अनेक विषयांवर अनेक कवित्या लिहील्या आहेत. 1992 मध्ये आलेल्या ‘द वर्ल्ड आइरिस’ ला लुइस यांच्या उत्कृष्ट कविता संग्रहांपैकी एक मानले जाते. यात ‘स्नोड्रॉप’ कवितेत सर्दीनंतर रुळावर आलेल्या आयुष्याला दाखवले आहे.