आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगामध्ये ध्वनी प्रदूषण वेगाने वाढत आहे. यामुळे मनुष्य, प्राणी आणि झाडांनाही नुकसान पोहोचत आहे. मोठ्या शहरांपासून ते दुर्गम भागापर्यंत सर्व ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात सापडत आहेत. जास्त आवाजामुळे मेटाबॉलिझमशी संबंधित आजार, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका वाढतो. इतकेच नाही तर हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. तीव्रतेने आणि सातत्याने होणाऱ्या आवाजामुळे युरोपात दरवर्षी ४८,००० लोक हृदयविकाराने प्रभावित होताहेत आणि सुमारे १२,००० लोकांचे अकाली निधन होत आहे. जर्मन फेडरल पर्यावरण एजन्सीचे (यीबीए) आवाजतज्ज्ञ थॉमस माइक सांगतात, ‘एखादा फ्लॅट किंवा घर मुख्य रस्त्यावर असेल तर कमी भाडे द्यावे लागते. म्हणजेच ज्या लोकांची कमाई कमी आहे, ते गोंगाट असलेल्या ठिकाणी राहण्याची शक्यता अधिक आहे.’
आवाजाचा परिणाम मनुष्यांसोबतच प्राण्यांवरही होत आहे. एका संशोधनात आढळले की, गोंगाटामुळे सर्व प्राण्यांच्या प्रजातींच्या वर्तनात बदल दिसत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे पक्षी मोठ्या आवाजात गात आहेत किंवा मोठा आवाज काढत आहेत, जेणेकरून आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करता येईल. युरोप, जपान किंवा ब्रिटनच्या शहरांमध्ये राहणारे टिट पक्षी हे जंगलात राहणाऱ्या टिट पक्ष्यांच्या तुलनेत मोठ्या आवाजात गातात. रस्त्याच्या कडेला राहणारे किडे, नाकतोडे, बेडकांच्या आवाजातही बदल दिसून आला.
न्यूयॉर्कसह सर्व मोठ्या शहरांत गोंगाट मानकांपेक्षा जास्त
लंडन ते ढाक्यापर्यंत आणि बार्सिलोना ते बर्लिनपर्यंत सर्व शहरांत जास्त गोंगाट होत आहे. न्यूयॉर्कमध्ये सार्वजनिक परिवहनाचा वापर करणारे ९० टक्के लोक सामान्य मर्यादेपेक्षा जास्त आवाजाचा सामना करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.