आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन:मांसाहारी मुलांचे वजन शाकाहारी मुलांच्या तुलनेत अधिक, ती ओव्हरवेट असण्याची शक्यताही जास्तच

बर्लिन12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मांसाहारी मुलांच्या तुलनेत शाकाहारी मुलांचे वजन अर्ध्यापेक्षा कमी असू शकते. २ ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांवरील एका संशोधनात आहारामुळे असे होत असल्याची शक्यता वर्तवली आहे. टोरंटोतील सेंट मिशेल्स हॉस्पिटलच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या संशोधनातून हा खुलासा झाला आहे. संशोधकांनी ९ हजार मुलांना यात सहभागी केले होते. या मुलांची उंची, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) आणि पोषण जवळपास मांस खाणाऱ्या मुलांसारखेच होते. मात्र, त्यांच्या बीएमआयची गणना केली असता शाकाहारी मुलांचे वजन कमी असण्याची शक्यता ९४ टक्क्यांपर्यंत असल्याचे समजले. ८७,००० मांसाहारी मुलांपैकी ७८ टक्के मुलांचे वजन वयानुसार योग्य होते. शाकाहारींमध्ये योग्य वजनाची ७९ टक्के मुले होती. वयानुसार कमी वजनाच्या मुलांकडे पाहिले असता मांसाहारींमध्ये केवळ ३% कमी वजनी आढळले. अशा शाकाहारी मुलांची संख्या ६% निघाली. याच आधारे शाकाहारी मुले कमी वजनी असण्याची शक्यता जास्त असल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला. तसेच मटण खाणाऱ्या मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याचा धोका जास्त असल्याचेही आढळले. शास्त्रज्ञांनी यासाठी शाकाहारी जेवणात मुलांच्या विकासाची आवश्यक पोषक द्रव्ये नसल्याचे कारण ससांगितले आहे. सोबतच आशियातील मुले अधिक शाकाहारी असल्याचेही म्हणाले. यामुळे त्यांचे वजन कमी असल्याची शक्यताही वर्त‌वली.

भारतामध्ये मुलांच्या विकासाचे मोजमाप वेगळे आहे
संशोधनात सहभागी बालरोगतज्ज्ञ डॉ. जोनाथन मॅग्युरी म्हणाले, भारत व अमेरिकेत मुलांच्या विकासाचे मोजमाप वेगळे आहे. भारतात ५ वर्षांच्या मुलीचे वजन १७ किलो, उंची १०८ सेंटिमीटर असावी. तर अमेरिकेत १८ किलो वजन असावे. त्यामुळे आशियातील बहुतांश शाकाहारी मुलांच्या वजनाबाबत हा निष्कर्ष काढण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...