आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाल्टिक समुद्रातील नॉर्ड स्ट्रीम अंडरवॉटर गॅस पाइपलाइन 26 सप्टेंबर 2022 रोजी उडवण्यात आली होती. आता यामागे युक्रेनचा पाठिंबा असलेल्या गटाचा हात असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात म्हटले आहे. पण युक्रेन सरकारच्या सहभागाचा कोणताही पुरावा सापडलेला नाही. रशिया या पाइपलाइनद्वारे जर्मनीला स्वस्त दरात गॅस पुरवत असे.
न्यूयॉर्क टाइम्समध्ये एका अमेरिकन अधिकाऱ्याचा हवाला देऊन म्हटले आहे की, पाइपलाइन उडवण्यात राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की किंवा त्यांचे कोणतेही सहकारी सहभागी असल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. युक्रेनियन अधिकार्यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे कृत्य केल्याचा कोणताही पुरावा नाही. त्याचवेळी, झेलेन्स्की यांचे राजकीय सल्लागार म्हणाले की, यात युक्रेनचा हात नव्हता हे आम्ही नि:संदिग्धपणे सांगू शकतो.
पाइपलाइनमध्ये ब्लास्ट केल्याचा रशियावर झाला होता आरोप
नाटो देश नॉर्ड स्ट्रीम पाइपलाइनला धोका म्हणून पाहतात. ही जर्मनीसाठी वरदानासारखी होती. याद्वारे रशियाकडून स्वस्त दरात जर्मनीला गॅस पुरवठा केला जात होता. मात्र, या स्फोटाचे श्रेय रशियाला देण्यात आले.
अमेरिकेवरही झाले आरोप
नॉर्ड स्ट्रीम अंडरवॉटर गॅस पाइपलाइनमध्ये झालेल्या स्फोटाचा अमेरिका आणि नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) देशांनी निषेध केला. रशियाने पाश्चात्य देशांना दोष देत कारवाईची मागणी केली. त्याचवेळी अमेरिकन पत्रकार सेमोर हर्श यांनीही दावा केला होता की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या सांगण्यावरून ही पाइपलाइन गुपचूप उडवण्यात आली होती. मात्र, त्यांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत.
व्हाइट हाऊसने फेटाळून लावले हे आरोप
पत्रकार सीमोर हर्श यांनी वृत्तात म्हटले की, पाण्याखालील गॅस पाइपलाइनवर बॉम्बस्फोट हा गुप्त ऑपरेशनचा भाग म्हणून नॉर्वेहून सीआयएने केला होता. मग खोल समुद्रात, अमेरिकन पाणबुड्यांनी त्या पाइपलाइन्सभोवती भूसुरुंग टाकून ती उडवली. हे दावे व्हाइट हाऊसने फेटाळले आहेत. व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या अँड्रिया बेस्टर यांनी हा अहवाल खोटा असल्याचे म्हटले आहे.
संबंधित वृत्त
युरोपची 'लाइफलाइन' उडवली कुणी?:नॉर्ड स्ट्रीम गॅस पाइपलाइनमध्ये स्फोटाची शंका, गळतीमुळे समुद्रात 1 किमी व्यासाचा बुडबुडा, युरोप- रशियात आरोप-प्रत्यारोप
स्वीडनच्या राष्ट्रीय भूकंप नेटवर्कने मंगळवारी सांगितले की, त्यांना बाल्टिक समुद्राखालील रशियन गॅस पाइपलाइनमध्ये दोन स्फोट आढळले आहेत. नेटवर्कने सांगितले की, त्यांनी बोर्नहोमच्या डॅनिश बेटाच्या आग्नेय भागात सोमवारी पहाटे एक स्फोट नोंदवला, तर दुसरा बेटाच्या ईशान्य भागात होता. नंतरचा उद्रेक हा 2.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या समतुल्य असल्याचे त्यात म्हटले आहे. पोलंड आणि डेन्मार्कमधील राजकारणी आणि तज्ज्ञांनी बाल्टिक समुद्रमार्गे रशियापासून जर्मनीपर्यंतच्या दोन नैसर्गिक वायू पाइपलाइनमध्ये असामान्य गळतीची भीती व्यक्त केली. येथे वाचा सविस्तर वृत्त
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.