आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:आता सामान्य डीएनए चाचणीवरून न्यूरो डिसऑर्डरचेही निदान शक्य, जीनोम सिक्वेन्सिंग करण्याची गरज नाही

लंडन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूराेलाॅजिकल डिसऑर्डर बद्दल नेहमीच अनिश्चितता दिसून येते. परंतु आता हे निदान सामान्य डीएनए तपासणीद्वारेही शक्य आहे. आजार आेळखण्यासाठी जीनाेम सिक्वेन्सिंगची दीर्घ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया देखील गरजेची नाही. जीनाेमिक इंग्लंड व क्वीन मेरी विद्यापीठात अनेक वर्षांपासून हनटिंग्टन राेग म्हणजे न्यूराेलाॅजिक डिसआॅर्डरवर संशाेधन सुरू हाेते. मेरुरज्जू विकाराचे निदान होण्यासाठी नव्या तंत्राचा शोध लावण्यात आला आहे. आतापर्यंत न्यूरो डिसऑर्डरमागील कारणांना शोधणे कठीण काम होते. कारण या आजाराची लक्षणे अनुवंशिक रूपाने दिसून येत नाहीत. त्यांची लक्षणे शोधून काढण्यात अनेक वर्षे निघून जात होती. परंतु डीएनएवर आधारित नव्या संशोधनानुसार केवळ त्याचा तपासच नव्हे तर या तंत्रामुळे उपचार करणे शक्य होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.

क्वीन मेरी विद्यापीठातील प्रो. मार्क कॉलफील्डनुसार त्याचे योग्य वेळीच निदान झाल्यास त्यावर प्रभावीपणे उपचार करता येऊ शकतात. एनएसएस जीनोमिक मेडिसिन सर्व्हिस कॅन्सरसारख्या न्यूरो डिसऑर्डर संबंधी इंग्लंडमध्ये शोधासाठी लोकांना निमंत्रित केले जाते. त्यातून गंभीर आजारांचे निदान करणे शक्य होईल. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी अनेकदा जास्त वर्षे प्रतीक्षा करावी लागते. आजारी जीनविषयी माहिती मिळू शकेल. परंतु डीएनएमुळे त्याचे लवकर निदान होईल. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

डीएनए अल्गोरिदममुळे आजारी जीन शोधणे शक्य
डॉ. एरियाना टुची म्हणाले, नव्या संशोधनामुळे न्यूरॉ डिसऑर्डरला डीएनए अल्गोरिदममुळे आजारी असलेल्या जीनचा शोध घेता येईल. संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग करण्याची गरज नाही. रुग्णाच्या डीएनएला निरोगी व्यक्तीच्या डीएनएशी जोडावे लागेल. डीएनए अल्गोरिदममुळे आजारी जीनला सहजपणे विलग रूपात आेळखून त्या दिशेने उपचार सुरू करता येऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...