आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरिया:उत्तर कोरियाने पहिल्यांदाच स्वीकारला कोरोना संसर्ग, 2.5 कोटींच्या देशात अद्याप एकालाही डोस नाही

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाबाधित लोक असल्याचे उत्तर कोरियाने गुरुवारी पहिल्यांदाच मान्य केले. त्याचबरोबर हुकूमशहा किम जोंग उन यांनी देशात लाॅकडाऊन लागू करत असल्याचे जाहीर केले. गेल्या दोन वर्षांत कोरोना संसर्गाचे अनेक रुग्ण आढळून आले होते. परंतु उत्तर कोरियाने या काळात जनतेला कोरोना संसर्ग झाल्याचे कधीही मान्य केले नव्हते. कोरोनाची बाधा झालेला रुग्ण प्होगाँगमध्ये आढळून आला आहे. सरकारी सूत्र म्हणाले, हा रुग्ण ओमायक्राॅनने बाधित आहे. राष्ट्रपती उन यांनी पाेलिसांच्या आणीबाणीच्या बैठकीत संसर्ग रोखणे व पुरेशा आैषधाेपचाराची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.

30 लाख चिनी लसी घेण्यास नकार 20 लाख यूएनचे डोसही नाकारले होते

बातम्या आणखी आहेत...