आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर कोरियामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर शुक्रवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्याच वेळी, अशा 5 लोकांचा मृत्यू झाला आहे ज्यांच्यात कोरोनाची पुष्टी झाली नाही. सरकारी मीडियानुसार, सध्या देशातील 1,87,000 लोकांना तापाची लक्षणे जाणवत आहेत, ज्यामुळे त्यांना आयसोलेट करण्यात आले आहे.
8 मे रोजी उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. गुरुवारी याची पुष्टी झाली आणि यासह देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, उत्तर कोरियाने 2020 च्या अखेरीस 13,259 लोकांच्या नमुन्यांची चाचणी केली होती. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
नॉर्थ कोरियात 'ताप' पसरला
देशाच्या KCNA वृत्तसंस्थेनुसार, राजधानी प्योंगयांगमध्ये एप्रिलच्या शेवटी, लोक अचानक तापेच्या विळख्यात येऊ लागले. हा ताप पसरता-पसरता प्योंगयांगच्या बाहेरही गेला आहे. आतापर्यंत एकूण 3,50,000 लोकांमध्ये या तापाची लक्षणे दिसून आली आहेत. तसेच, यापैकी किती लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत हे एजन्सीने उघड केलेले नाही.
देशात कोणीही लसीकरण केलेले नाही
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, उत्तर कोरिया यावेळी कोरोना स्फोटाच्या स्थितीत असू शकतो. तज्ज्ञांचे असे मत आहे की, देशात राहणार्या 2.5 कोटी लोकांचे जीवन धोक्यात आहे, कारण येथे कोणालाही लस मिळणार नाही, तसेच त्यांना चांगल्या आरोग्य सुविधाही मिळणार नाहीत. येथे पसरणारा ताप हा खरंतर कोरोनाचा ओमिक्रॉन प्रकार असू शकतो.
उत्तर कोरियाने ब्रिटन आणि चीनसारख्या देशांमध्ये बनवलेली लस खरेदी करण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्याऐवजी, सरकारने जानेवारी 2020 मध्ये सर्व सीमा बंद करून कोरोनाला देशात प्रवेश करण्यापासून रोखले असल्याचे सांगितले.
लॉकडाऊन खरा धोका बनू शकतो
तज्ज्ञांच्या मते, उत्तर कोरियाला खरा धोका कोरोनाचा नसून लॉकडाऊनचा आहे. लोकसंख्येचा मोठा भागही कुपोषणाने त्रस्त आहे. गेल्या दोन वर्षांपासून सीमा बंद झाल्यामुळे व्यापार असाही कमी झाला आहे. आता लॉकडाऊन लागू झाल्याने अन्न आणि औषधांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.
बीबीसीच्या म्हणण्यानुसार, उत्तर कोरियामध्ये लॉकडाऊन किती कडक असू शकतो याची सध्या आम्हाला कल्पना नाही. हुकूमशहा किम जोंग उन आपली खरी स्थिती सांगून जगाकडून मदत घेण्याचे संकेत देत असावेत.
गुरुवारी किम जोंग पहिल्यांदा कोरोनावर झालेल्या बैठकीत टीव्हीवर मास्क घातलेले दिसले होते. देशातील व्हायरस नियंत्रित करण्यासाठी, जास्तीत जास्त आणीबाणीचे आदेश दिले गेले आहेत, ज्यामध्ये कामाच्या ठिकाणी गर्दी न करणे आणि स्थानिक लॉकडाऊन यांसारख्या प्रोटोकॉलचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.