आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर कोरियामध्ये पालकांनी हॉलिवूड चित्रपट किंवा मालिका पाहिल्यास त्यांना तुरुंगात टाकले जाऊ शकते. हॉलिवूड किंवा दक्षिण कोरियातील कोणताही चित्रपट पाहिल्यास मुलांना 5 वर्षांची शिक्षा आणि त्यांच्या पालकांना 6 महिन्यांची मजुरी करावी लागेल.
प्योंगयांगमधील बैठकीदरम्यान नवीन कायद्याची घोषणा करताना, पालकांनी आपली मुले वेळोवेळी काय पाहत आहेत याची काळजी घ्यावी, असे म्हटले होते. जर पालकांनी मुलांचे घरी चांगले संगोपन केले नाही तर ते भांडवलशाहीचे गुणगान करत मोठे होतील आणि समाजविरोधी बनतील, असेही त्यांचे मत आहे.
उत्तर कोरियामध्ये नवीन कायद्याबाबत इशारा जारी
नवीन कायद्यानुसार, जर कोणी आपल्या मुलांना परदेशी चित्रपट किंवा शो पाहण्याची परवानगी दिली तर त्यांना कठोर शिक्षा होईल. असा इशारा जारी देण्यात आला आहे. आतापर्यंत मुलांच्या पालकांना इशारे देऊन सोडून दिले जात होते, मात्र नवीन कायद्यात पहिल्या गुन्ह्यासाठीही मुलावर आणि पालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
हा इशारा केवळ चित्रपटांपुरता मर्यादित नाही. उत्तर कोरियामध्ये, जर कोणी परदेशी विशेषत: दक्षिण कोरियातील पारंपरिक नृत्य करताना, गाताना किंवा बोलताना आढळले तर त्याला आणि त्याच्या पालकांना 6 महिन्यांची शिक्षा होईल.
2 विद्यार्थ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा
याआधी डिसेंबर 2016 मध्ये उत्तर कोरियात हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या दोन मुलांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. रेडिओ फ्री एशियाच्या रिपोर्टनुसार, दोन्ही विद्यार्थ्यांचे वय 15-16 वर्षे आहे. त्याला जमावासमोर सार्वजनिकरीत्या गोळ्या घालण्यात आल्या. या दोन्ही विद्यार्थ्यांनी त्यांच्या मित्रांना अनेक कोरियन ड्रामाचे वाटपही केले होते. वास्तविक, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामध्ये तणाव आहे. यामुळे उत्तर कोरियाचे लोक दक्षिण कोरियामध्ये बनवलेले शो आणि चित्रपट पाहू शकत नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.