आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी:म्हणाल्या- उत्तर कोरियाशी भिडाल तर अणुबॉम्बने नष्ट करू, विनाश टाळायचा असेल तर मर्यादेत राहायला शिका

प्योंगयांग4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनची बहीण किम यो जोंग यांनी दक्षिण कोरियाला अणुबॉम्बने नष्ट करण्याची धमकी दिली आहे. किम यो जोंग म्हणाल्या की, जर दक्षिण कोरियाने लष्करी मुकाबला केला तर आमची न्यूक्लिअर कॉम्बॅट फोर्स आपले काम करेल.

हुकूमशहाच्या बहिणीने दक्षिण कोरियाचे संरक्षण प्रमुख सुह वूक यांची खिल्ली उडवली आणि म्हटले की उत्तर कोरियाविरुद्ध हल्ल्याबद्दल बोलणे ही त्यांची मोठी चूक होती. त्यांच्या सैन्याला आम्ही आमच्या दर्जाचे मानत नाहीत.

याआधी दक्षिण कोरियाच्या संरक्षण प्रमुखांनी केले होते वक्तव्य

खरं तर, दक्षिण कोरियाचे संरक्षण प्रमुख सुह वूक यांनी शुक्रवारी म्हटले होते की, आमच्याकडे उत्तर कोरियाच्या कोणत्याही लक्ष्यावर अचूक मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर किम यो जोंग यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यो जोंग पुढे म्हणाल्या - अण्वस्त्रांचे पहिले काम देशाचे रक्षण करणे आहे, परंतु जर थेट लढा सुरू झाला तर त्यांचा वापर शत्रूच्या सैन्याला नष्ट करण्यासाठी केला जाईल. मग दक्षिण कोरियाच्या सैन्याचा भयंकर नाश होईल. हे टाळायचे असेल तर त्यांनी स्वतःला मर्यादेत ठेवायला हवे.

स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण, पाचवे अपत्य आहे हुकूशहाची बहीण

किम यो जोंग या माजी हुकूमशहा किम जोंग-इल यांचे पाचवे आणि सर्वात लहान अपत्य आहे. 31 वर्षीय किम यो जोंगने आपल्या भावाप्रमाणेच स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेतले आहे. 2002 मध्ये त्या आपल्या देशात परतल्या. त्या पॉलिट ब्युरोच्या सदस्य आहेत आणि प्रचार तसेच आंदोलन विभागाच्या सहायक संचालकदेखील आहेत.

किमच्या इमेजमागे त्यांच्या बहिणीचेचे डोके

देश-विदेशात किमची सार्वजनिक प्रतिमा बनवण्यामागे किम यो जोंगचा मेंदू असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यांना किम जोंग उनची 'सीक्रेट डायरी' असेही म्हटले जाते. असे मानले जाते की त्या त्यांच्या भावाला अनेक विषयांवर सल्ला देतात आणि अनेक कामांमध्ये सहभागीही असतात.

बातम्या आणखी आहेत...