आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर कोरियाने वाढत्या तणावासाठी अमेरिका आणि दक्षिण कोरियाला जबाबदार धरले आहे. या दोन्ही देशांकडून सातत्याने केल्या जात असलेल्या लष्करी सरावाने स्थिती अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आणल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे. या सरावाच्या प्रत्युत्तरात आक्रमक कारवाईची धमकी उत्तर कोरियाच्या हुकुमशहाने दिली आहे.
उत्तर कोरियाची वृत्तसंस्था केसीएनएला दिलेल्या एका विधानात तिथल्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा विश्लेषकांनी अमेरिका आणि दक्षिण कोरियातील लष्करी सरावाची निंदा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की - दोन्ही देशांनी मिळून कोरियन पेनिन्सुलामध्ये (उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया) युद्धस्थितीला चालना दिली आहे. यामुळे हे क्षेत्र एका मोठ्या बॉम्बमध्ये रुपांतरित झाले आहे, जे कधीही फुटू शकते.
उत्तर कोरिया म्हणाला - अमेरिका व दक्षिण कोरिया हल्ल्यांचा सराव करत आहेत
उत्तर कोरियाने लष्करी सरावावर तीव्र प्रतिक्रिया देताना, याला हल्ल्याचा सराव म्हटले आहे. वास्तविक, अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैन्यात मार्चच्या सुरुवातीपासूनच लष्करी सराव सुरू आहे. यात वायूदल आणि नौदल सरावाचाही समावेश आहे. या सरावात अमेरिकेच्या F-35 जेटसनीही सहभाग घेतला होता.
याशिवाय दोन्ही देशांचे 12 हजार नाविकांसह 30 युद्धनौका, 70 विमाने आणि 50 अॅम्फिबियस लढाऊ वाहने सहभागी झाले. गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेला हा लष्करी सरावात गेल्या 5 वर्षांतील सर्वात मोठा सराव असल्याचे बोलले जात आहे. या सरावााल फ्रीडम शील्ड असे नाव देण्यात आले आहे. दोन्ही देशांनी 2018 मध्ये उत्तर कोरियासोबत शांती चर्चा सुरू करताना या प्रकारचा सराव बंद केला होता.
उत्तर कोरियाने दाखवली अण्वस्त्रे
अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सरावादरम्यान उत्तर कोरियानेही सातत्याने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसह दुसऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. सोबतच काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरिायने प्रथमच आपले अण्वस्त्र जगासमोर सादर केले होते. यादरम्यान उत्तर कोरियाने आणखी घातक अण्वस्त्र बनवण्याचीही घोषणा केली होती.
अण्वस्त्रे छोटी, तरिही अमेरिकेपर्यंत पोहोचण्यास सक्षम
उत्तर कोरियाने आपल्या अण्वस्त्रांना हवासॅन-31 नाव दिले आहे. अण्वस्त्र तज्ञांचे म्हणणे आहे की उत्तर कोरियाची शस्त्रे नक्कीच लहान आहेत मात्र ती आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांवर बसवून अमेरिका व दक्षिण कोरियात विध्वंस करता येऊ शकतो.
सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटीचे प्रा. क्यून सू यांच्यानुसार मंगळवारी प्रथमच अधिकृतरित्या दाखवलेले उत्तर कोरियाची अण्वस्त्रे 2016 च्या तुलनेत मोठी आहेत. यातून अण्वस्त्रे बनवण्यातील त्यांची प्रगती स्पष्टपणे दिसते.
निर्बंधांनंतरही उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्या
संयुक्त राष्ट्राने उत्तर कोरियाच्या आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांवर निर्बंध लादले आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास यामुळे उत्तर कोरिया आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करू शकत नाही. मात्र तरीही उत्तर कोरियाकडून सातत्याने क्षेपणास्त्र चाचण्या केल्या जातात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.