आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाला उत्तर कोरियाचा शस्त्रपुरवठा:अमेरिकेचा आरोप -मध्यपूर्व व उत्तर आफ्रिकेच्या मार्गे पोहोचवण्यात येत आहे दारुगोळा

कीव्ह/मॉस्कोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेने उत्तर कोरियावर रशियाला गुप्तपणे शस्त्रपुरवठा करण्याचा आरोप केला आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, युक्रेनविरोधातील युद्धात उत्तर कोरिया थेटपणे रशियाची मदत करत आहे. तो मध्यपूर्व व उत्तर आफ्रिकेच्या मार्गाने आपले शस्त्र रशियाला पोहोचवत आहे.

अमेरिकन संरक्षण विभागाने पेंटागनचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले - आमच्या माहितीनुसार, मध्यपूर्व व उत्तर आफ्रिकेमार्गे गुप्तपणे रशियाला शस्त्र पुरवठा केला जात आहे. सप्टेंबमध्येच रशिया उत्तर कोरियाकडून शस्त्रास्त्र खरेदी करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त आले होते. पण हे शस्त्र रशियाला पोहोचले किंवा नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आम्ही याचा तपास करत आहोत.

इराणकडून ड्रोन पुरवठा

जॉन किर्बी म्हणाले - इराण रशियाला ड्रोन व क्षेपणास्त्रांचा पुरवठा करत असल्यावरही अमेरिका चिंताग्रस्त आहे. युद्धातील 8 महिन्यांनंतर रशियाने युक्रेनवर इराणी शस्त्रांनी हल्ला सुरू केला आहे. इराणी सैनिकांना रशियाच्या मदतीसाठी क्रीमियाला पाठवण्यात आले आहे. ते तिथे रशियन सैनिकांना ड्रोनचे प्रशिक्षण देत आहेत.

अमेरिका का चिंताग्रस्त

रशिया युद्दात युक्रेनवर इराणच्या कामीकाजे ड्रोनने हल्ला करत आहे. अमेरिकन सैनिकांवरही या ड्रोनने हल्ला झाला आहे. अमेरिकन लष्कराच्या माहितीनुसार, इराण पुरस्कृत अतिरेक्यांनी इराकमधील अमेरिकन लष्करी तळावर यंदा तब्बल 10 वेळा या ड्रोनने हल्ला केला आहे.

पाकची युक्रेनला अण्वस्त्र तयार करण्यात मदत

रशियाने दावा केला आहे की, पाकिस्तान अणुबॉम्ब तयार करण्यासाठी युक्रेनची मदत करत आहे. रशियाचे खासदार इगोर मोरोजोव्ह यांच्या मते, युक्रेनच्या लष्कराला पाकिस्तान तोफगोळ्यांचा पुरवठा करत आहे. यापूर्वी पाकवर उत्तर कोरिया व लीबियाला अणुबॉम्बचे तंत्रज्ञान दिल्याचा आरोप झाला होता. रशियाने अणुबॉम्बची माहिती असणाऱ्या युक्रेनच्या अनेक नागरिकांनी पाकचा दौरा केल्याचाही आरोप केला आहे.

रशिया पुन्हा UN करारात सहभागी

रशियाने संयुक्त राष्ट्राच्या ग्रेन डीलमध्ये पुन्हा एकदा सहभागी होण्याची घोषणा केली आहे. आता युक्रेनला काळ्या समुद्रातून गव्हाची वाहतूक करता येईल. रशियाने युक्रेनच्या हल्ल्याचा विरोधात गव्हाची वाहतूक करण्याच्या करारातून काढता पाय घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर रशियाने हा निर्णय घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...