आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

उ. कोरियात हुकूमशाहीचा 75 वा स्थापना दिन:परेडमध्ये हजारोंची गर्दी, हुकूमशहा म्हणाले- शक्ती वाढवत राहणार, संचलनादरम्यान उन भावनिक झालेले दिसले

प्याेगाँग16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर काेरियाने ७५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. कार्यक्रमात काही अत्याधुनिक शस्त्रास्त्रे प्रदर्शनात मांडण्यात आली हाेती. ही शस्त्रास्त्रे पाहून जगभरातील देशांनी उत्तर काेरियाच्या शक्तीचा अंदाज बांधला. यानिमित्ताने हुकूमशहा किम जाँग उन यांनी जनतेला मार्गदर्शन केले. देशाला पुढे नेण्यासाठी काम करत राहू, असे त्यांनी सांगितले. आम्ही कोणाशीही युद्ध करू इच्छित नाहीत. परंतु स्वसंरक्षणासाठी शक्ती वाढवत राहू. ही शस्त्रे देशाच्या सुरक्षेसाठी आहेत. आम्ही त्याचा कधीही चुकीचा व अकारण वापर करणार नाहीत. मात्र आमच्यावर बळाचा वापर करत असल्यास आम्ही त्यांना शिक्षा जरूर देऊ, असा इशारा याप्रसंगी किम जाँग यांनी दिला. कार्यक्रमाला लोक हजारोंच्या संख्येने हजर होते.

शक्तिप्रदर्शनाचा उद्देश
लष्करी संचलनात उत्तर काेरियाने केलेल्या शक्तिप्रदर्शनावर दक्षिण काेरियाने चिंता व्यक्त केली आहे. उत्तर काेरियात दाेन वर्षांनंतर लष्करी संचलन झाले आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या तोंडावर उत्तर कोरियाने नवीन शस्त्रास्त्रांचे दर्शन घडवल्याचे मानले जाते.