आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दक्षिण कोरिया उत्तर कोरिया:दक्षिण कोरियाला उत्तर देण्यासाठी उ.कोरिया १.२ कोटी पत्रके पाठवणार

सेऊलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दक्षिण कोरियाला चिडवण्यासाठी उ. कोरिया पुन्हा लावतोय ध्वनिक्षेपक
Advertisement
Advertisement

 उत्तर काेरिया अाणि दक्षिण काेरियादरम्यान पत्रके छापून एकमेकांच्या सीमेत टाकण्याचे प्रचारतंत्र शिगेला पोहोचले आहे. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाला उत्तर देण्यासाठी १.२ कोटी पत्रके छापली. यातील मोठ्या संख्येने त्यांनी दक्षिण कोरियाच्या सीमेत टाकली.

उत्तर कोरियाची मध्यवर्ती वृत्तसंस्था केसीएनएने सोमवारी सांगितले की, जवळपास ३००० हायड्रोजन फुग्यांसह विशेष उपकरणे तयार केली जातील. मात्र ते दक्षिण कोरियाच्या सीमेत केव्हा पाठवले जातील हे सांगितले नाही. याआधी केसीएनएने सांगितले की, सर्व विद्यापीठांतील विद्यार्थी पत्रके वितरित करण्यासाठी तयार आहेत.

६७ वर्षांपूर्वी सुरू झाले होते पत्रकांवरून प्रचारतंत्र

या प्रकारे पत्रके एक-दुसऱ्या देशाच्या सीमेत पाठवून देशाच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल नाराजी व्यक्त करण्याची परंपरा १९५३ पासून सुरू आहे. ताजा वाद दक्षिण कोरियाच्या सीमेतून उत्तर कोरियाच्या हुकूमशहांबद्दल अपशब्द लिहिलेली पत्रके फुग्यांसोबत पाठवण्याने सुरू झाला. किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग हिने हे बंद करण्याची मागणी दक्षिण कोरियाकडे केली होती. मात्र, तसे झाले नाही. यामुळे नाराज किम यो हिने दक्षिण कोरियाला इशारा दिला होता. याच्या एक दिवसानंतर २०१८ मध्ये बनवण्यात आलेले सीमेवरील चर्चेसाठीचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्यात आले होते.

दक्षिण कोरियाला चिडवण्यासाठी उ. कोरिया पुन्हा लावतोय ध्वनिक्षेपक

दक्षिण कोरियाला चिडवण्यासाठी उत्तर कोरिया पुन्हा एकदा पनमुंजोम सीमेवर (डिमिलिटरी झोन) ४० ठिकाणी लाऊडस्पीकर लावण्याची तयारी करत आहे. हे ध्वनिक्षेपक किम जोंग आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेई यांच्यातील शिखर बैठकीनंतर झालेल्या करारांतर्गत एप्रिल २०१८ मध्ये काढण्यात आले होते. तेव्हा दोन्ही देशांनी एक-दुसऱ्याच्या विरोधात सर्व प्रकारचे शत्रुत्व वाढणाऱ्या साधनांवर बंदी लावण्याचा निर्णय घेतला होता. तसे पाहता ध्वनिक्षेपकांना एक-दुसऱ्यासाठी अपशब्द वापरण्यासाठी बंद करण्याचा निर्णय १९७० च्या दशकात झाला होता.

Advertisement
0