आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफवांना पूर्णविराम:उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम 20 दिवसांनंतर जगासमोर, फर्टिलायझर फॅक्ट्रीचे उद्घाटनही केले

प्योंगयांग3 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • उत्तर कोरियाचा हुकूमशाह 20 दिवसांनंतर पहिल्यांदा जगासमोर

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (36) शुक्रवारी 20 दिवसांनंतर पहिल्यांदा जगासमोर आले. जोंग यांनी एका फर्टिलायझर फॅक्ट्रीचे उद्घाटनही केले. न्यूज एजन्सीनुसार किम 11 एप्रिलला पोलितब्यूरो पार्टी मीटिंगनंतर कोणासमोरही आले नव्हते. स्टेट मीडियावर याच दिवशी किमने एअर डिफेन्स युनिट आणि फायटर जेट्सचे निरीक्षण केले होते. किम 15 एप्रिल आपले आजोबा किम इल सुंग यांच्या आठवणीत होणाऱ्या वार्षिक कार्यक्रमातही सहभागी झाले नव्हते. असे पहिल्यांदाच घडले होते. तेव्हापासूनच किंविषयी विविध प्रकारचे तर्क-वितर्क लावण्यात येत होते. परंतु आता किम  जोंग उन स्वस्थ आणि जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

15 एप्रिल पासूनच किमशी संबंधित विविध सॅटेलाईट फोटो आणि रिपोर्ट समोर येण्यास सुरुवात झाली. यामध्ये त्यांच्यावर कार्डियोवेस्कुलर सर्जरी झाल्यापासून ते  त्यांच्या मृत्यूचाही दावा करण्यात आला होता.