आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानमध्ये इशारा:उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र भरकटले, जपानमध्ये लोक बंकरमध्ये लपले

टोकियोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर कोरियाने सोडलेले इंटरकॉन्टिनेन्टल बॅलेस्टिक क्षेपणास्त्र २२ मिनिटे हवेत राहिल्यानंतर भरकटून जपानच्या उत्तर प्रांताजवळ प्रशांत महासागरात कोसळले. त्यामुळे जपानमध्ये इशारा देण्यात आला. जपानचे पंतप्रधान फूमियो किशिदा यांनी याला निर्दयी संबोधले. याबाबत माहिती घेण्याचे आदेश दिले. तिकडे उत्तर प्रांतातील मियागी, यामागाटा आणि निगाता क्षेत्रात लोकांना घरात राहण्याचे वा बंकरमध्ये लपण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, कोणत्याही प्रकारच्या हानीचे वृत्त नाही. संरक्षणमंत्र्यांनी म्हटले की, ‘प्रत्युत्तर देण्याचा विचार सुरू आहे.’

बातम्या आणखी आहेत...