आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • North Korea's Entry In US President Elections Now! Kim Jong Can Test Trump's Ballistic Missile With Submarine

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणूक:अमेरिकेच्या निवडणुकीत उत्तर कोरियाचे ‘क्षेपणास्त्र’, किम जोंग यांचा ट्रम्प यांना चाचणीद्वारे अडथळ्याचा प्रयत्न!

टोकियोहून ज्युलियन रायल7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तर कोरिया 75 व्या स्थापनादिनी शक्तिप्रदर्शन करणे शक्य, उपग्रहाच्या छायाचित्रात पेंगयाँगमध्ये लष्करी जमवाजमव

उत्तर कोरियात सत्ताधारी असणारा किम जोंग उन यांचा वर्कर्स पक्ष (WPK) येत्या १० ऑक्टोबरला ७५ वा स्थापना दिवस साजरा करेल. यानिमित्त व्यापक संचलनाची तयारी सुरू आहे. किम सरकार या परेडमध्ये आपली लष्करी शक्ती दाखवण्यासाठी पाणबुडीवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करू शकते असे मानले जात आहे. गेल्या दोन महिन्यांतील उपग्रह छायाचित्रात पेंगयाँगमध्ये हजारो सैनिक आणि लष्करी वाहने परेडमध्ये सहभागी होत असल्याचे दिसत आहे.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार ही परेड व क्षेपणास्त्र चाचणीमुळे या क्षेत्रात तणाव निर्माण होऊ शकतो. तसेच अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूक बघता किम जोंग उनदेखील आपली लष्करी शक्ती दाखवून या संधीचा फायदा उचलतील. कारण परेड बघण्यासाठी हजारो लोक येतात यामुळे किमसाठी आपली शस्त्रे दाखवण्याची ही एक चांगली संधी असेल. २०१७ मध्ये जेव्हा उत्तर कोरियाचे जनक समजले जाणारे किम यांचे आजोबा किम- २ संग यांच्या जन्मदिनी परेड काढण्यात आली होती, त्यात जगाला पहिल्यांदाच इंटर- काँटिनेंटल बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे दर्शन झाले होते.

किम सरकारच्या या तयारीमुळे दक्षिण कोरियाही तणावात आहे. गेल्या काही दिवसांत दक्षिण कोरियाच्या संरक्षणमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितले की, शेजारी देश पाणबुडीवरून किंवा बुडालेल्या लाँचपॅडवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीच्या तयारीत आहेत. तर दक्षिण काेरियाच्या दक्षिण कमांडचे लष्करी अधिकारी वोन इन चुल यांनी सांगितले की, सिन्पो शिपयार्ड जे उत्तर कोरियाच्या पाणबुड्यांचे तळ आहे तेथे दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर बॅलेस्टिक क्षेपणास्त्र एसएलबीएमची चाचणी करू शकतो. संरक्षण तज्ञांच्या मते, उत्तर कोरियाने याआधीही अनेक टप्प्यांत त्यांच्या पहिल्या स्वदेशी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली असून पाणबुडीवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडण्याची क्षमता मिळवण्याच्या तयारीत असल्याचे त्यांना वाटते. उत्तर कोरिया सरकार प्रशांत महासागर भागात बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची क्षमता असणारे जहाज तैनात करून हवाई किंवा इतर अमेरिकी लष्करी तळ आपल्या टप्प्यात घेऊ इच्छिते. तिकडे अमेरिकेनेही इशारा देत म्हटले की, अशा प्रकारे शस्त्रांच्या तैनातीमुळे तणाव वाढेल.सेऊलच्या ट्राय विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक डॅन पिंक्सटन सांगतात की, उत्तर कोरियाच्या इतिहासात वर्धापन दिवस खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी पेंगयाँगचे सत्ताधारी आपले नेतृत्व लष्करी सामर्थ्यातून जाहीर करतात. दरम्यान, उपग्रहापासून वाचवण्यासाठी या शस्त्रांना तंबूत ठेवण्यात आले आहे. असे अनेक गॅरेज बनवण्यात आले आहेत. काही बांधकाम दिसताहेत त्यात लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र लाँच करणारे ट्रान्सपोर्टर इरेक्टर लाँचर (टीईएल) ठेवण्यात आले आहेत.

सैनिकांच्या हालचालींत झाली वाढ

३८ नॉर्थ नावाच्या वेबसाइटवर काही नवीन उपग्रह छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. या छायाचित्रांमध्ये मिरिम परेड ट्रेनिंग ग्राउंडमध्ये किम-२ सुन यांची एक मोठी प्रतिकृती दिसून आली. तसेच शेकडो गाड्या मैदानाजवळ उभ्या केल्या होत्या. छायाचित्रांत शेकडो सैनिकांचा मार्चपास्टही आहे. मिरिन ग्राउंडमध्ये अनेक बांधकाम करण्यात आली आहेत. या मैदानात क्षेपणास्त्र लाँचर यांची गर्दी दिसते.

बातम्या आणखी आहेत...